Join us

हात खराब न करता 2 मिनिटांत मळून होईल पीठ; १ सोपी ट्रिक, मऊसूत-फुगलेल्या होतील चपात्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:51 IST

Trick To Soft Pluffy Roti (Mau Chapati Kashi Banvayachi, How To Make Roti) : ही ट्रिक करण्यासाठी तुम्हाला फक्त ३ पदार्थांची आवश्यकता असेल.

भारतीय घरांमध्ये चपात्या (Chapati) करणं हे रोजचं काम असतं. कारण बरेच लोक नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला चपाती खातात. हे काम करण्यात बरीच मेहनत लागते (Cooking Hacks). जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर चपात्या कडक होतात आणि चवही बिघडते. कमी मेहनतीत तुम्ही भरपूर कामं करू शकतात (How To Make Soft Gol Roti). युट्यूबर शिल्पी यांनी एक सोपा, इफेक्टिव्ह उपाय सांगितला आहे. ज्यामुळे फक्त २ मिनिटांत तुम्ही सॉफ्ट पीठ मळू शकता. (Secret Trick To Make Soft Dough In 2 Minutes Foe Making Soft Roti At Home)

कोणतं सामान लागेल?

ही ट्रिक करण्यासाठी तुम्हाला फक्त ३ पदार्थांची आवश्यकता असेल. गव्हाचं पीठ, मीठ आणि पाणी. बरेचजण चपातीत मीठ घालत नाही तु्म्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार मीठ टाळू शकता.  मिठामुळे गव्हाची कणीक लवकर खराब होत नाही.

पीठ मळण्याची पहिली स्टेप कोणती

सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात पीठ घ्या. यात अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिसळा. नंतर यात हळूहळू पाणी घाला. नंतर पीठ मळू नका फक्त पाणी घातलेलं राहू द्या.

१० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या

नंतर हे ओलं पीठ झाकून १० ते १५ मिनिटांसाठी तसंच ठेवा.  यादरम्यान पीठ स्वत:पाणी खेचून घेईल आणि  मऊ होईल. यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. या १० ते १५ मिनिटांत तुम्ही पीठ मळून ठेवू शकता किंवा भाजीसुद्धा चिरून ठेवू शकता. जेणेकरून वेळ वाचेल आणि जास्त मेहनत लागणार नाही.

उपवासाला 5 मिनिटांत करा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स, बटाटा न उकडता-न वाळवता पटकन होतील

2 मिनिटांत पीठ मळून होईल

नंतर तुम्हाला दिसेल की पीठ मऊ झालं आहे.  नंतर आपल्या हातांना हलकं ओलं करून पीठ एकत्र मळून घ्या. जास्त हात खराब न करता मऊसूत कणीक मळून होईल. नंतर हलक्या हातानं दाबून गोळे तयार करून घ्या. चपातीच्या पिठात पाणी मिसळण्यात आणि नंतर पीठ एकजीव करण्यात फक्त 2 मिनिटं वेळ लागेल. पिठात पाणी घालून ठेवल्यानंतर मधल्या वेळेत तुम्ही इतर कामं भराभर करू शकता. 

ही पद्धत परीणामकारक का आहे?

या पद्धतीचं सिक्रेट आहे पाणी शोषून घेण्याची प्रक्रिया. जेव्हा तुम्ही पिठात पाणी मिसळून काही वेळासाठी ठेवता तेव्हा पिठात पाणी चांगल्या पद्धतीनं शोषलं जातं. गव्हाच्या पिठातील ग्लुटेन कणकेला लवचीक आणि मऊ बनवते. यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स