साजूक तूप (Pure Ghee) करणं हे खूपच थकवणारं आणि वेळखाऊ काम असतं. तूप बनवून झाल्यानंतर बराचवेळ तुपाची भांडी स्वच्छ करण्यात जातो. कारण ही भांडी खूपच तुपकट झालेली असतात काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीनं साजूक तूप बनवू शकता. घरी तूप बनवण्यासाठी तासनतास घालवण्याची काहीच गरज नाही. प्रेशर कुकरचा वापर करून तुम्ही कमी वेळात साजूक तूप तयार करू शकता. (Secret Trick to make More Pure Ghee From Malai In 5 Minutes at Home)
तूप करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर सोयीस्कर ठरतो. दुधाची साय कढईत तासनतास शिजवावी लागते तेव्हा कुठे तूप निघतं. कुकरमध्ये साय पाण्यासोबत घातल्यास एक शिट्टी घेऊन तूप तयार करता येतं. कुकरमध्ये पाणी थोडं पाणी घातल्यास साय जळत नाही किंवा चिकटतही नाही. ज्यामुळे कुकर स्वच्छ करणं सोपं जातं. फक्त २ पदार्थ घालून तुम्हाला कुकरची एक शिटी घ्यावी लागेल(Pure Ghee Making At Home). युट्यूबर पूनम देवनानी यांनी तूप करण्यासाठी काही घरगुती पदार्थ मिसळण्यास सांगितले आहेत. तूप करण्याची सोपी पद्धत पाहूया. (How To Make Ghee In Cooker)
तूप तयार करण्याचा सिक्रेट पदार्थ काय?
कुकरमध्ये साय घालून एक शिटी घेतल्यानंतर कुकरचं झाकण उघडून पुन्हा शिजवून घ्या. यादरम्यान अर्धा ते पाऊण चमचा बेकिंग सोडा यात घाला. कारण बेकिंग सोडा एका कॅटलिस्टच्या स्वरूपात काम करतो. ज्यामुळे साईचं तूप सहज निघण्यास मदत होते. ही केमिकल रिएक्शन तूप बनवण्यास मदत करते. ज्यामुळे तासनतास लागणारं काम काही मिनिटांत होतं आणि तुपाचं प्रमाणही वाढतं.
बेकिंग सोडा घातल्यानंतर सायीपासून लवकर तूप बनतं. या तीव्र प्रक्रियेला ही ट्रिक खूपच खास बनवते. पारंपारीक पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीत तूप करण्याचा वेळ खूपच कमी होतो. तूप तयार होऊ लागेल तेव्हा वरून थोडं पाणी घाला. तूप दाणेदार होण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
तूप थंड होत असताना दाणेदारही होतं. दाणेदार तूप शुद्ध आणि चांगल्या गुणवत्तेचं असतं. तूप करण्याआधी साय फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. रूम टेम्परेचरवर आलेली साय कुकरमध्ये लवकर वितळते आणि बेकिंग सोड्यासोबत प्रक्रिया होते. यामुळे तूप करण्यासाठी लागणारा पूर्ण वेळ कमी होतो.
