मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फॅशन, फिटनेस आणि लाइफस्टाइलविषयी ती इंस्टाग्रामवर नियमित पोस्ट करत असते. (Sara Tendulkar’s Special Protein Coffee Goes Viral, Celebrity Fitness Drink Trend)अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या दिवसाची सुरवात तिला कशी करायला आवडते सांगितले. सकाळी ती कॉफी पिते मात्र नेहमीसारखी नाही जरा वेगळी.
साराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने तिच्या दैनंदिन रूटीनमधील हेल्दी पर्याय म्हणून प्रोटीन कॉफीचा उल्लेख केला. साधारण ब्लॅक कॉफी किंवा मिल्क कॉफीऐवजी प्रोटीन पावडर मिसळून तयार केलेली ही कॉफी सध्या फिटनेस जगतात ट्रेंडमध्ये आहे. वर्कआउटनंतर शरीराला प्रोटीनची गरज असते, तर कॉफीमधील कॅफिन शरीराला ताजेतवाने ठेवते. फिटनेसकडे विशेष लक्ष देणाऱ्या तरुणांमध्ये अशा प्रकारच्या पेयांची लोकप्रियता वाढताना दिसते. प्रोटीन कॉफीमुळे स्नायूंना पोषण मिळते, थकवा कमी होतो आणि दिवसभरासाठी ऊर्जा मिळण्यास मदत होते.
उन्हाळ्यात ही कॉफी प्यायला जास्त मजा येईल कारण त्यात बर्फ घातला जातो. सारा म्हणते तिला भरपूर प्रमाणात बर्फ घातलेली कॉफीच आवडते. हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात गार या दोन्ही पद्धतीने ही कॉफी करता येते. साराने दाखवलेली रेसिपी पाहा.
साहित्य चॉकलेट प्रोटीन पावडर, कॉफी, अगोड कोको पावडर, चिया सिड्स, बदामाचे दूध, बर्फ
कृती१. एका मिक्सरच्या भांड्यात चमचाभर प्रोटीन पावडर घ्यायची. त्यात एक ग्लास ब्लॅक कॉफी घालायची. तसेच वाटीभर भिजवलेले चिया सिड्स घालायचे. नंतर त्यात चमचाभर अगोड कोको पावडर घालायची. एक ग्लास बदामाचे दूध घालायचे. आवडीनुसार बर्फ घालायचा.
२. मिक्सरमधून मस्त फिरवून घ्यायचे. छान कॉफी तयार होते. जरा घट्टच असू दे. म्हणजे प्यायला छान लागते.
Web Summary : Sara Tendulkar's protein coffee recipe is trending. She adds protein powder, cocoa, chia seeds, almond milk, and ice to her coffee. This drink provides energy and aids muscle recovery, perfect for fitness enthusiasts seeking a healthy and refreshing beverage.
Web Summary : सारा तेंदुलकर की प्रोटीन कॉफी रेसिपी ट्रेंड कर रही है। वह अपनी कॉफी में प्रोटीन पाउडर, कोको, चिया सीड्स, बादाम का दूध और बर्फ मिलाती हैं। यह पेय ऊर्जा देता है और मांसपेशियों की रिकवरी में मदद करता है, जो स्वस्थ और ताज़ा पेय चाहने वाले फिटनेस उत्साही लोगों के लिए एकदम सही है।