Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थी स्पेशल - दहा मिनिटांत करा ‘असा’ दुधाचा पेढा, नैवैद्यासाठी उत्तम पदार्थ आणि चवही अप्रतिम

संकष्टी चतुर्थी स्पेशल - दहा मिनिटांत करा ‘असा’ दुधाचा पेढा, नैवैद्यासाठी उत्तम पदार्थ आणि चवही अप्रतिम

Sankashti Chaturthi Special - Make Milk Pedha in ten minutes, a great dish for festivals and the taste is amazing : संकष्टीसाठी करा हा खास पदार्थ. सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2025 15:12 IST2025-10-09T15:11:06+5:302025-10-09T15:12:02+5:30

Sankashti Chaturthi Special - Make Milk Pedha in ten minutes, a great dish for festivals and the taste is amazing : संकष्टीसाठी करा हा खास पदार्थ. सोपी रेसिपी.

Sankashti Chaturthi Special - Make Milk Pedha in ten minutes, a great dish for festivals and the taste is amazing | संकष्टी चतुर्थी स्पेशल - दहा मिनिटांत करा ‘असा’ दुधाचा पेढा, नैवैद्यासाठी उत्तम पदार्थ आणि चवही अप्रतिम

संकष्टी चतुर्थी स्पेशल - दहा मिनिटांत करा ‘असा’ दुधाचा पेढा, नैवैद्यासाठी उत्तम पदार्थ आणि चवही अप्रतिम

संकष्टी चतुर्थी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. जो प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा करतात.  या दिवशी गणेशाची पूजा करुन अडथळे दूर करण्याची प्रार्थना केली जाते. संकष्टीच्या दिवशी खास पदार्थ केले जातात. संकष्टी चतुर्थीच्या प्रसादामध्ये गोड पदार्थांना विशेष महत्त्व आहे. मात्र घाईगडबडीच्या दिवशी म्हणजेच 'विक डे'ला कोणता सण आला की घाईच होते. कारण आजकाल सगळ्याच जणी वर्कींग आहेत. (Sankashti Chaturthi Special - Make Milk Pedha in ten minutes, a great dish for festivals and the taste is amazing)अशावेळी प्रसादासाठी ठराविक पदार्थ झटपट केले जातात. यंदा मात्र हा चविष्ट पदार्थ करुन पाहा.  मिल्क पावडरचा पेढा हा सोपा, मस्त गोड आणि जलद तयार होणारा पदार्थ आहे. हा दूधजन्य पदार्थ देवतेला अर्पण करण्यास योग्यच ठरेल आणि घरातील सर्व वयोगटातील लोकांना आवडेलही.

चवीला फारच मस्त लागतो. तसेच अगदी दहा मिनिटांत होतो. पाहा कसा करायचा हा पेढा. विशेष म्हणजे मोजक्या पाच पदार्थांमध्ये करता येतो. 

साहित्य 
दूध, पिठीसाखर, वेलची पूड, मिल्क पावडर, तूप  

कृती
१. एका नॉनस्टीकी पॅनमध्ये वाटीभर दूध घ्यायचे. त्यात वाटीभर पिठीसाखर घालायची. दोन्ही पदार्थ छान ढवळायचे. पिठीसाखर लगेच विरघळते. ती विरघळल्यावर त्यात दोन वाटी मिल्क पावडर घालायची. चमचाभर वेलची पूड घालायची आणि मिश्रण मस्त ढवळायचे. 

२. दहा मिनिटे मंद आचेवर शिजवल्यावर मिश्रण घट्ट होते. घट्ट व्हायला लागले आणि पॅन सोडायला लागले की त्यात दोन चमचे तूप घालायचे. व्यवस्थित ढवळायचे आणि मग गॅस बंद करायचा. मिश्रण एका परातीत काढून घ्यायचे. हाताने त्याचे छान पेढे तयार करायचे. 

३. तुम्हाला आवडत असेल तर त्याला काजू लावा. तसेच बदामही लाऊ शकता. विविध पदार्थ वापरु शकता. हवे ते पदार्थ लावायचे. बेदाणे, पिस्ता असे अनेक पर्याय आहेत. आवडीनुसार लावायचे. 

Web Title : संकष्टी चतुर्थी स्पेशल: दस मिनट में दूध का पेड़ा, नैवेद्य के लिए उत्तम

Web Summary : संकष्टी चतुर्थी के लिए झटपट दूध का पेड़ा बनाएं। यह आसान रेसिपी मिल्क पाउडर, चीनी, घी और इलायची का उपयोग करती है। मिनटों में तैयार, यह एक मीठा प्रसाद है और सभी उम्र के लोगों को पसंद आएगा। इच्छानुसार सूखे मेवों से सजाएँ।

Web Title : Sankashti Chaturthi Special: Ten-Minute Milk Pedha Recipe for Festive Offering

Web Summary : Make quick milk pedhas for Sankashti Chaturthi. This easy recipe uses milk powder, sugar, ghee, and cardamom. Ready in minutes, it's perfect as a sweet offering and enjoyed by all ages. Garnish with nuts as desired.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.