मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्याची देखील तितकीच काळजी घेते. ती कायमच आपल्या फिटनेसची खूप (Sai Tamhankar’s Favourite Healthy Dish of Pumpkin) काळजी घेते. इतकंच नाही तर फिट राहण्यासाठी ती तितकीच मेहेनत देखील घेते. सई अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत फिटनेससंबंधित आरोग्यदायी टिप्स शेअर करत असते. सईला वेगवेगळे पदार्थ खाण्याची (Sai Tamhankar healthy recipe) खूप आवड आहे, पण ती नेहमी आरोग्य आणि फिटनेसच्या दृष्टीने हेल्दी पदार्थांचीच निवड करते. तिच्या मते, फिटनेससाठी जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा योग्य आहार घेणे जास्त महत्त्वाचे आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिची एक खास आणि आवडती (Sai Tamhankar favourite food) हेल्दी रेसिपी शेअर केली आहे, जी चवीलाही उत्तम आणि आरोग्यासाठीही लाभदायक आहे.
शक्यतो भोपळा किंवा भोपळ्याची भाजी म्हटलं तर अनेकजण नको म्हणून मान हलवतात किंवा नाकं मुरडतात. पण सईला आवडणारा आणि हेल्दी असा पदार्थ हा चक्क लाल भोपळा आहे. अनेकांच्या घरात लाल भोपळ्याची भाजी केली की ती खाल्ली जात नाहीच. अशावेळी, आपण हा लाल दुधी भोपळा जरा हटके वेगळ्या पद्धतीने तयार करु शकतो. सई सांगते या लाल भोपळ्याच्या (Pumpkin in desi ghee recipe) हटके डिशची रेसिपी तिने, हिंदी टेलिव्हिजन व सूत्रसंचालक अभिनेता राजीव खंडेलवाल यांच्याकडून शिकली. सईला आवडणारी व तितकीच हेल्दी अशी लाल भोपळ्याची झटपट होणारी ही भन्नाट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. लाल भोपळा - १ कप (स्लाईसमध्ये कापलेला)
२. मीठ - चवीनुसार
३. साजूक तूप - १ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका पॅनमध्ये थोडे साजूक तूप घालावे. मंद आचेवर साजूक तूप व्यवस्थित वितळवून घ्यावे.
२. लाल भोपळा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून मग त्याचे पातळ असे काप तयार करून घ्यावेत.
३. साजूक तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात हे भोपळ्याचे काप व चवीनुसार थोडे मीठ घालावे.
४. २ ते ३ मिनिटे हे काप तुपात नीट शिजवून घ्यावेत.
साजूक तुपात परतवून घेतलेले हे भोपळ्याचे हेल्दी काप खाण्यासाठी तयार आहेत. आपण सकाळच्या नाश्त्याला अशी पोटभरीची व हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता.
राखी पौर्णिमा स्पेशल : झटपट करा ब्रेडचा कलाकंद! विकतपेक्षा भारी मऊमऊ-रवाळ कलाकंद करा झटपट...
गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ५ टिप्स - मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा...
सईचा आवडता हेल्दी पदार्थ खाण्याचे फायदे...
१. साजूक तूप :- साजूक तूप पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेला नैसर्गिक चमक देते. मेंदूला बळकटी आणि ऊर्जा मिळते. सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. शरीरातील वायू दोष कमी करण्यास फायदेशीर. रोगप्रतिकारशक्ती वाढते व थकवा दूर करून शरीराला उर्जा देते.
२. लाल भोपळा :- लाल भोपळा डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. व्हिटॅमिन 'ए' आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. त्वचा साफ व तेजस्वी ठेवतो. वजन कमी करण्यासाठी मदत करतो. पचनासाठी हलका आणि फायदेशीर आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो.