श्रावणी सोमवारचा उपवास बहुतांश घरांमध्ये केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मंडळींपर्यंत सगळेच जण अगदी हौशीने श्रावणी सोमवारचा उपवास करतात. त्यामुळे घरात सगळ्यांना उपवास असल्याने फराळाचे काही खास आणि वेगळे पदार्थही हमखास केले जातातच. आता या सोमवारी असाच एक वेगळा पदार्थ करून पाहा.. एरवी आपण मक्याचे पॉपकॉर्न भरपूर खातो. आता साबुदाण्याचे खमंग, कुरकुरीत पॉपकॉर्न करून पाहा. याला तुम्ही साबुदाण्याचा चिवडा असंही म्हणू शकता (sabudana popcorn for shravani somvar fast). हे पॉपकॉर्न करायला अगदी सोपे आहेत (how to make sabudana popcorn?). दुपारी चहाच्यावेळी स्नॅक्स म्हणून किंवा मुलांना शाळेसाठी नाश्त्याच्या डब्यात द्यायला म्हणूनही हा पदार्थ अगदी छान आहे.(sabudana chivda recipe for fast)
साबुदाण्याचे पॉपकॉर्न करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी साबुदाणा
२ टेबलस्पून शेंगदाणे
१ टेबलस्पून तूप किंवा शेंगदाण्याचं तेल
पौष्टिक म्हणून ब्रोकोली खाणंही देतं आजारपणाला आमंत्रण, पाहा कुणी ब्रोकोली अजिबात खाऊ नये
२ हिरव्या मिरच्या
लिंबाचा रस अर्धा ते एक चमचा
चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर
कृती
साबुदाणा पॉपकॉर्न करण्यासाठी साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तो ४ ते ५ तास भिजत घाला.
यानंतर भिजवलेला साबुदाणा थोडा पसरवून ठेवा आणि त्याच्यातलं पाणी निथळून जाऊ द्या.
मळकट पांढरे सॉक्स, शर्टची कॉलर धुण्याची भन्नाट ट्रिक, ब्रशने घासत बसण्याची गरजच नाही- घ्या उपाय
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप घालून आधी शेंगदाणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे तळून घ्या. तुम्ही या पॉपकॉर्नमध्ये काजु, मनुकाही घालू शकता.
यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे, मिरच्यांचे तुकडे कढईतून बाहेर काढा आणि त्यामध्ये साबुदाणा घाला. जसा जसा साबुदाणा गरम होत जाईल तसा तसा तो फुलत जाईल. हे चालू असताना कढईतला साबुदाणा सतत हलवत राहा, अन्यथा तो जळू शकतो.
राखीपौर्णिमा : पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नाही? १० मिनिटांत घरीच करा टोमॅटो फेशियल, चेहरा चमकेल
आता कढईतला साबुदाणा छान फुलून आला की त्यामध्ये तळलेल्या मिरच्या, शेंगदाणे, मीठ, साखर घाला आणि सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. छान खमंग, कुरकुरीत आणि तोंडाला चव आणणारे साबुदाणा पॉपकाॅर्न झाले तयार..