Lokmat Sakhi >Food > Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ...

Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ...

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: Sabudana Paratha : How To Make Sabudana Paratha : Fasting Sabudana Paratha : Upvasacha Sabudana Paratha : साबुदाण्याची खिचडी किंवा वड्यापेक्षा करुन पाहा, हा खास चविष्ट उपवासाचा पराठा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 14:49 IST2025-07-01T14:13:31+5:302025-07-01T14:49:29+5:30

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: Sabudana Paratha : How To Make Sabudana Paratha : Fasting Sabudana Paratha : Upvasacha Sabudana Paratha : साबुदाण्याची खिचडी किंवा वड्यापेक्षा करुन पाहा, हा खास चविष्ट उपवासाचा पराठा...

Sabudana ka Paratha Sabudana Paratha How To Make Sabudana Paratha Fasting Sabudana Paratha Upvasacha Sabudana Paratha | Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ...

Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ...

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. आषाढी एकादशी निमित्त आपल्यापैकी बरेचजण उपवास करतात. उपवास म्हटलं की खाण्यापिण्यावर मर्यादा येतात. उपवासाला (Sabudana Paratha) आपण शक्यतो काही मोजकेच (How To Make Sabudana Paratha) पदार्थ खाऊ शकत असल्याने, आपण साबुदाण्याची खिचडी, वडे असे काही नेहमीचेच मोजके पदार्थ करु खातो. परंतु काहीवेळा प्रत्येक उपवासाला तेच ते खिचडी, वडे आणि उपवासाचे मोजके पदार्थ खाऊन (Upvasacha Sabudana Paratha) कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी नवीन, मस्त टेस्टी पण तितकाच पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ खावासा वाटतो. अशा परिस्थितीत आपण अगदी १० ते १५ मिनिटांत तयार होणारा साबुदाण्याचा पराठा तयार करु शकतो(Upvasacha Sabudana Paratha).

उपवासातील पौष्टिकता आणि स्वादाचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला हा (Fasting Sabudana Paratha) पराठा खूपच खमंग आणि चवीला उत्तम असा पदार्थ आहे. हा साबुदाण्याचा पराठा उपवासातील आहारात बदल म्हणून एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. उपवासात फायदेशीर असलेल्या साबुदाण्याला दिलाय भन्नाट ट्विस्ट, जो उपवासात भरपूर ऊर्जा देतो आणि चवीलाही अतिशय रुचकर लागतो. यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचा पराठा करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. साबुदाणा - २ कप 
२. बटाटा - २ (उकडलेले बटाटे)
३. मीठ - चवीनुसार 
४. जिरे - १/२ टेबलस्पून 
५. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)
६. पाणी - गरजेनुसार 
७. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून 

Maharashtrian Alu Vadi Recipe: अस्सल मराठी चवीची पारंपरिक अळूवडी करायची आहे? ‘हे’ घ्या परफेक्ट प्रमाण...


Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीसाठी करा खास शिंगाड्याच्या पिठाचे लाडू, पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ...

कृती :- 

१. सगळ्यातआधी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात कच्चा साबुदाणा घेऊन तो मिक्सरमध्ये फिरवून त्याचे बारीक पीठ तयार करून घ्यावे. 
२. मिक्सरमध्ये बारीक केलेलं साबुदाण्याचे पीठ एका बाऊलमध्ये काढून त्यात उकडलेले बटाटे किसून घालावेत. त्याचबरोबर, यात चवीनुसार मीठ, जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. 

अस्सल गावरानं चवीचं पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचं पिठलं! पारंपरिक मराठमोळी झक्कास झटपट रेसिपी...

३. आता या मिश्रणात हळूहळू गरजेनुसार पाणी ओतून पीठ छान मळून घ्यावे. या मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करुन घ्यावेत. 
४. हे गोळे चपातीप्रमाणेच गोलाकार आकारात लाटून घ्यावेत. 
५. गरम पॅनवर साजूक तूप पसरवून, तेल किंवा तुपावर हे पराठे दोन्ही बाजुंनी अगदी खमंग भाजून घ्यावेत. उपवासाचा साबुदाणा पराठा खाण्यासाठी तयार आहे. 

उपवासाचा गरमागरम साबुदाणा पराठा दही किंवा चटणीसोबत खाण्यासाठी अधिकच चविष्ट लागतो.

Web Title: Sabudana ka Paratha Sabudana Paratha How To Make Sabudana Paratha Fasting Sabudana Paratha Upvasacha Sabudana Paratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.