Join us

कच्च्या कैरीचं करा गारेगार, चटपटीत सरबत; एक घोट घेताच रिफ्रेश व्हाल, शरीराला मिळेल गारवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:55 IST

Row mango Sharbat : उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते.

उन्हाळ्याच्या दिवसात ताज्या कैऱ्या बाजारात दिसायला सुरूवात होते. कैऱ्यांचे अनेक पदार्थ बनवले जातात. त्यात कैरीचे पन्हं, लोणचं,  कैरीची भाजी, कैरीचा तक्कू यांचा समावेश असतो. कैरीचं गारेगार सरबतही चवीला चांगलं लागतं. कैरीचं सरबत बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही फक्त ताज्या कैऱ्या बाजारातून आणाव्या लागतील.  (Row mango Sharbat) उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. बाहेरचं आईस्क्रीम, सरबत, फालुदा असे पदार्थ खाण्यापेक्षा कोकम सरबत, लिंबू सरबत किंवा कैरीचं सरबत घरीच बनवल्यास पौष्टीक, हेल्दी थंड पदार्थांचा आस्वाद घेता येईल. (How to make Kairi sharbat)

साहित्य

भाजलेले जिरे पावडर - १ टीस्पून

काळे मीठ - १ टीस्पून

कच्चा आंबा - १

खडी साखर- १/४ कप

थंडगार पाणी - २ कप

पुदिन्याची पाने -  ७ ते ८

सब्जा - १ कप

कृती

1) सगळ्यात आधी कैरीचे साल काढून घ्या. कैरी कापून मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात खडीसाखरेचे दाणे, जीरे पावडर, मीठ घाला. हे मिश्रण  मिस्करमध्ये बारीक करून घ्या.  

2) त्यात पुदीना आणि बर्फाचे तुकडे घालून परत मिक्सरमधून फिरवून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून  त्यात गार पाणी घाला आणि सब्जाच्या भिजवलेल्या बीया, बर्फाचे तुकडे घालून सरबत ढवळून घ्या. एका ग्लासाला लिंबू तिखट, मीठ लावून हे सरबत ग्लासात भरून सर्व्ह करा. 

कैरीचे सरबत पिण्याचे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात याच्या रोजच्या वापरामुळे पोटाच्या समस्या दूर राहतील आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल. हे एक उत्तम पाचक पेय आहे.

उष्णतेच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी सरबताचे सेवन खूप फायदेशीर आहे. हे तुम्हाला उष्माघात होण्यापासून प्रतिबंधित करेल आणि शरीरात द्रवपदार्थ टिकवून ठेवण्यास मदत करेल.

व्हिटॅमिन सी समृद्ध असल्याने ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि विविध आरोग्य समस्यांपासून तुमचे रक्षण करते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न