Lokmat Sakhi >Food > अपघातानंतर फिट होण्यासाठी ऋषभ पंत खात होता दोन महिने खिचडी, खा मसाला खिचडी टेस्टही पोषणही

अपघातानंतर फिट होण्यासाठी ऋषभ पंत खात होता दोन महिने खिचडी, खा मसाला खिचडी टेस्टही पोषणही

Rishabh Pant's favorite khichdi, eat masala khichdi, healthy and tasty recipe : खिचडी म्हणजे आरोग्यासाठी मस्त पदार्थ. चवीला छान आणि शरीरासाठीही उपयुक्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 19:08 IST2025-07-07T19:05:25+5:302025-07-07T19:08:12+5:30

Rishabh Pant's favorite khichdi, eat masala khichdi, healthy and tasty recipe : खिचडी म्हणजे आरोग्यासाठी मस्त पदार्थ. चवीला छान आणि शरीरासाठीही उपयुक्त.

Rishabh Pant's favorite khichdi, eat masala khichdi, healthy and tasty recipe | अपघातानंतर फिट होण्यासाठी ऋषभ पंत खात होता दोन महिने खिचडी, खा मसाला खिचडी टेस्टही पोषणही

अपघातानंतर फिट होण्यासाठी ऋषभ पंत खात होता दोन महिने खिचडी, खा मसाला खिचडी टेस्टही पोषणही

खिचडी म्हणजे आजारी लोकांच जेवण असं तुम्हालाही वाटतं का ? तसं वाटत असेल तर एकदा ही खिचडी खाऊन पाहा. (Rishabh Pant's favorite khichdi, eat masala khichdi, healthy and tasty recipe)मस्त झणझणीत आणि चवीला जबरदस्त अशी ही खिचडी सगळ्यांनाच नक्की आवडेल. अपघातानंतर दोन महिने ऋषभ पंत खिचडीच खात होता. तो बराही झाला, तब्येत आणि फिटनेसही कमवली. त्यामुळे खिचडी वाटते साधी पण आहे पौष्टिक.

साहित्य 
तांदूळ, कोथिंबीर, तेल, मोहरी जिरे, हिंग, कडीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, आले, लसूण, हळद, टोमॅटो, तमालपत्र, लाल तिखट, मीठ,  तूप

कृती
१. तांदूळ धुवायचे, चांगल्या दोन ते तीन पाण्यातून काढायचे आणि जरा निथळवून घ्यायचे. कोथिंबीर अगदी बारीक चिरायची. चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर तूप भाताला लावायचे. भात हिरवा दिसेल एवढी कोथिंबीर हवी. छान भरपूर कोथिंबीर वापरायची. 

२. हिरव्या मिरचीचे लांब लांब तुकडे चिरायचे. जास्त तिखट मिरची घेऊ नका. जेवढे तिखट आवडते तेवढेच घ्यायचे. कांद्याची साले काढा आणि कांदा छान बारीक चिरुन घ्या. थोडा कांदा लांब लांब चिरा. पातळ चिरायचा. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचा तुकडा किसून घ्यायचा.  लसूण बारीक चिरायचा. टोमॅटोची पेस्ट करायची. शिजवून घ्यायची गरज नाही. कच्चा टोमॅटोच मिक्सरला वाटून घ्यायचा. 

३. खोल कढईत तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की त्यात जिरे घालायचे आणि जिरेही जिरे छान खमंग परतायचे. त्यात एक तमालपत्र घालायचे. जिऱ्याचा वास सुटल्यावर त्यात कडीपत्याची पाने घालायची. कडीपत्ता तडतडला की त्यात हिंग घालायचे आणि मग हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परतायचे. तसेच किसलेले आले  घालून घ्यायचे आणि लसणाचे तुकडे घालून परतायचे.  हळद घालायची आणि लाल तिखट घालायचे. छान परतायचे. 

४. परतून झाल्यावर त्यात कांदा घालायचा आणि गुलाबी परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट घालायची. मस्त परतायचे. मसाल्याचा वास सुटल्यावर त्यात तांदूळ घालायचे जरा परतायचे आणि मग पाणी ओतायचे. खिचडी जरा मोकळी होईल एवढेच पाणी घ्यायचे. त्यात दोन चमचे तूप घालायचे आणि खिचडी ढवळायची आणि मग झाकून ठेवायची. छान खमंग होते. 

Web Title: Rishabh Pant's favorite khichdi, eat masala khichdi, healthy and tasty recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.