Bhutta Roast Tips : सध्या सगळीकडे पावसाचा रोमांचक सीझन सुरू आहे. पाऊस आला की, लोकांच्या मनासोबतच जिभेलाही आनंद मिळतो. कारण या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोक वेगवेगळे चटपटीत, गरमागरम पदार्थांवर ताव मारतात, तसेच वेगवेगळी फळं भाज्याही खातात. भुट्टा खाणं ही या दिवसात अनेकांची आवडती गोष्टी. कुठेही फिरायला गेले असताना ठेल्यावर लालेलाल कोळशांवर भाजलेले, लिंबू, मीठ आणि तिखटाचं मिश्रण लावलेले भुट्टे काही औरच आनंद देतात.
लोक केवळ फिरायला गेल्यावरच भुट्टे खातात असं नाही. बरेच लोक बाजारातून कच्चे भुट्टे घरी घेऊन येतात. घरी ते वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. कुणी त्यांचे दाणे काढून वेगळ्या डिशेज बनवतात, तर कुणी उकडून खातात. तर कुणी गॅसवर थेट भाजून खातात. पण कोळशावर जसा भुट्टा भाजला जातो, तसा गॅसवर नक्कीच भाजला जात नाही.
गॅसवर भुट्टा भाजताना तो कुठून कच्चा राहतो, तर कुठून जास्त भाजला जातो. अशात त्याची चवही हवी तशी म्हणजे कोळशावर भाजलेल्या भुट्ट्यासारखी लागत नाहीत. काही म्हणा पण घरी भाजलेला भुट्टा बाहेरच्या भुट्ट्यासारखा लागत नाही. पण हे शक्य आहे. कारण गॅसवर भुट्टा भाज्यण्याची योग्य पद्धत सुरैया किचनच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगण्यात आली आहे.
घरीच बाहेरच्या भुट्ट्यासारखी टेस्ट कशी मिळवाल?
सगळ्यात आधी तर भुट्टयाची साल आणि धागे काढून घ्या. आता भुट्टा पाण्यानं हलका धुवून घ्या आणि सुकू द्या किंवा स्वच्छ कापडाने पुसून घ्या. बऱ्याच लोकांना भुट्टा उकड़ून खाणंही आवडतं. हवं असेल तर आपणही तसेच खाऊ शकता.
आता गॅस स्टोव्हच्या बर्नरवर एक खोलवट जाळी ठेवा. त्यात कोळशाचे काही तुकडे टाका. गॅस मध्यम आसेवर सुरू करा, हळूहळू कोळशे लाल होऊ लागतील. त्यानंतर त्यावर भुट्टा ठेवून भाजा. यावेळी गॅस कमी करा. हळूहळू भुट्टा फिरवा, जेणेकरून सगळीकडून भाजला जाईल. या भुट्ट्यात स्मोकी टेस्टही येईल आणि चांगला भाजलाही जाईल.
भुट्टा जर चांगला भाजला असेल तर त्यावर काळं मीठ आणि लाल मिरची पावडर आवलेलं लिंबू घासा. आपला बाहेरची टेस्ट देणारा भुट्टा घरी तयार आहे.
घरीच जर भुट्टा खाल तर अधिक फायदेशीर असतं. कारण बाहेर जिथे भुट्टे भाजून मिळतात त्याजागी स्वच्छता किती असते हा प्रश्न असतो. जर स्वच्छता नसेल तर तेथील भुट्टे खाऊन तुमचं पोटही बिघडू शकतं. जे कुणालाच नको असतं.