Join us

चहा करताना चहा पावडर कधी घालावी, दुधात की पाण्यात? फक्कड, जाडसर चहाचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 21:05 IST

Right way to Make Tea : विकतसारखा चहा घरी बनत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते.  

बरेचजण सकाळी उठल्या उठल्या चहा पितात. चहा प्यायल्याशिवाय  दिवसाची सुरूवातच होत नाही असे बरेचजण असतात. चहा पिण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात. काहीजण कडक चहा पिणं पसंत करतात तर काहीजणांना हलका, दुधाचा चहा आवडतो (How To Make Tea).

विकतसारखा चहा घरी बनत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते.  चहा करण्याच्या पद्धतीत उत्तम चवीच्या चहाचे गुपित लपले आहे. चहा पावडर  योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घालायला हवी. ज्यामुळे चहाची चव, रंग, सुगंध परफेक्ट येतो. एक कप चहामध्ये किती चहा पावडर  घालायची समजून घेऊ. (Right Way to Make Tea)

चहा पावडर किती घालावी?

एक कप चहा करण्यासाठी एक कप पाणी किंवा दूध एक टिस्पून म्हणजेच २ ग्रॅम चहा पावडर  योग्य ठरते. यामुळे चहा कडक बनतो. जर तुम्हाला कडक चहा हवा असेल तर तुम्ही दीड टिस्पून चहा घालू शकता.  तुम्ही कोणत्या ब्रॅण्डची चहा पावडर वापराता ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. फ्लेवरसाठी तुम्ही वेलची किंवा आलं घालू शकता. 

चहा पावडरमध्ये कॅटेचिन आणि थीफ्लेविन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे शरीरात इंफ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास  मदत होते. लाईफ सायंसमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार नियमित आणि योग्य प्रमाणात चहा प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझ्म वाढतो. पण चहा पावडर जास्त घातल्यामुळे त्यात कॅफेन आणि टॅनिनचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे एसिडिटी, झोप न येणं अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून चहा करताना योग्य प्रमाणात मोजून मापून चहा पावडरचा वापर करायला हवा. 

चहा पावडर निवडताना ही काळजी घ्या

चहा पावडर नेहमी उत्तम दर्जाची आणि फ्रेश असावी. बाजारात वेगवेगळ्या चहा पावडर उपलब्ध असतात. चांगल्या चहाची निवड करताना, पावडरचा रंग गडद आणि दाणे एकसारखे आहेत का ते तपासा.

पावडरचा वास हा नैसर्गिक आणि सुगंधी  असावा. जर चहा पावडरला रासायनिक किंवा कृत्रिम वास येत असेल, तर ती घेऊ नका. चहा पावडर हवाबंद पॅकिंगमध्ये असावी, जेणेकरून तिचा सुगंध टिकून राहतो.

चहा पावडरमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ  केलेली नाही याची खात्री करा. भेसळयुक्त चहा पावडर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. विश्वसनीय आणि मान्यताप्राप्त ब्रँडची पावडर घेणे नेहमीच सुरक्षित असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Perfect Tea: Timing of Tea Powder for Rich Flavor

Web Summary : Unlock the secret to perfect tea! Use 2g of tea powder per cup. Fresh, high-quality tea leaves enhance flavor and provide antioxidants for better digestion. Avoid excessive tea powder to prevent acidity and sleep issues.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स