Lokmat Sakhi >Food > १ थेंबही तेल न वापरता करा टम्म फुगलेल्या पुऱ्या! ऑईल फ्री, पौष्टीक पुऱ्या करण्याची खास ट्रिक

१ थेंबही तेल न वापरता करा टम्म फुगलेल्या पुऱ्या! ऑईल फ्री, पौष्टीक पुऱ्या करण्याची खास ट्रिक

Right Way To Make Puri Without Oil : पुनम देवनानी यांनी खास पद्धत सांगितली आहे ज्यामुळे तेलाची गरज लागणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:09 IST2025-09-06T15:56:23+5:302025-09-06T16:09:49+5:30

Right Way To Make Puri Without Oil : पुनम देवनानी यांनी खास पद्धत सांगितली आहे ज्यामुळे तेलाची गरज लागणार नाही.

Right Way To Make Puri Without Oil : Less Oily Puri Making Tricks | १ थेंबही तेल न वापरता करा टम्म फुगलेल्या पुऱ्या! ऑईल फ्री, पौष्टीक पुऱ्या करण्याची खास ट्रिक

१ थेंबही तेल न वापरता करा टम्म फुगलेल्या पुऱ्या! ऑईल फ्री, पौष्टीक पुऱ्या करण्याची खास ट्रिक

बऱ्याच लोकांना पुरी खायला खूप आवडते. पावसाळ्याच्या दिवसांत किंवा सणासुधीला  गरमागरम पुऱ्या सर्वांनाच खायला आवडतात.  पण तेलामुळे बरेच लोक पुरी खाणं टाळतात. पुरी तळण्याची खास ट्रिक तुमचं काम सोपं करेल (Less Oily Puri Recipe) कारण तेलात पुरी तळल्यानंतर ती अन्हेल्दी होते. युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पुनम देवनानी यांनी खास पद्धत सांगितली आहे ज्यामुळे तेलाची गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला एअर फ्रायरची आवश्यकता असेल. (How To Make Puri Without Using Oil)

पूनम देवनानी यांनी  सांगितले पुरी करण्यासाठी सगळ्यात आधी गव्हाच्या पीठ मळावं लागेल. एक कप पिठात मीठ आणि २ चमचे दही घाला. आता हळूहळू पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या. तुम्ही पुरी तळण्यासाठी तेलाचा वापर करणार नसाल तर दह्याचा वापर पुरीला सॉफ्ट बनवण्याचं काम करेल. (Puri Recipe)

पुरी पाण्यात तळा

पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून योग्य आकाराच्या पुऱ्या लाटून घ्या. या दरम्यान गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर एक-एक करून पुऱ्या तळून घ्या. पुऱ्या  तळून झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक एक पुरी वर येत आहे नंतर पुरी काढून घ्या.

वाफवण्याचासुद्धा पर्याय तुमच्याकडे आहे

कढईवर छिद्र असलेलं किंवा जाळीचं झाकण ठेवून तुम्ही पुऱ्या वाफवू शकता. यामुळे पुऱ्या न तळता व्यवस्थित शिजतील. या पद्धतीनं पुऱ्या फुगत नसतील तर टेंशन घेण्याचं  काहीच कारण नाही. एक छोटी स्टेप वापरून तु्म्ही कुरकुरीत पुऱ्या तळू शकता.

ओव्हनप्रमाणेच एअरफ्रायचा वापरही बरेचजण करतात. सगळ्यात आधी एअर फ्रायर १८० डिग्रीवर प्री-हिट करा.नंतर त्यात पुरी ठेवून ४ मिनिटं बेक करा. एअर फ्रायमध्ये पुरी बिना तेलानं फुगतील आणि  तेलात तळतो तेव्हा फुगतात तश्याच पुऱ्या फुगतील.

पुरी तळण्यासाठी तव्याचा वापर

नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि त्यात अगदी थोडं तेल घाला. लाटलेली पुरी पॅनमध्ये ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा. यामुळे पुरी कुरकुरीत होईल, पण तेलात तळल्याप्रमाणे ती फुगणार नाही.

 

Web Title: Right Way To Make Puri Without Oil : Less Oily Puri Making Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.