तूप सुगंध आणि चवीसाठी आहारात वापरल जाते. पण बाहेरून विकत तूप आणण्यापेक्षा बरेचजण घरच्याघरी साय साठवून, लोणी कढवून तूप करतात. जास्तीत जास्त महिला या तासनतास साय गॅसवर ठेवतात तरीही तूप व्यवस्थित निघत नाही. यामुळे फक्त गॅस वाया जात नाही तर वेळही जातो. (Right Way To Make Pure Ghee From Malai)
कंटेट क्रिएटर कुसूम भट्ट यांनी एक उत्तम शॉर्टकट सुचवला आहे. या ट्रिकने तुम्ही फक्त १० मिनिटांत भरपूर तूप काढू शकता. यामुळे ना मिक्सर खराब होणार, ना तासनतास वाट पाहावी लागणार. कुसूम भट्ट यांनी सांगितलेल्या या टिप्स वापरून कमी मेहनतीत जास्त तूप काढता येईल. (Right Way To Make Pure Ghee From Malai In 10 Minutes By Save Time LPG Cylinder)
अनेकजण फ्रिजमधून साय बाहेर काढून लगेच गरम करायला ठेवतात ज्यामुळे तूप निघायला जास्त वेळ लागू शकतो. तूप करण्यासाठी कमीत कमी २ ते ३ तास आधी साय फ्रिजमधून बाहेर काढून ठेवायला हवी. साय जेव्हा पूर्णपणे रूम टेम्परेचरवर येईल तेव्हा तूप तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामुळे साय मऊ होईल आणि फॅट्स लवकर वेगळे होतील.
कढईत फेटण्याची पद्धत
साय मिक्सरमध्ये न फेटता एका मठ्या कढईत फेटा. कढईत साय काढून एका मोठ्या चमच्याच्या साहाय्याने एकाच दिशेनं फेटा. तुम्ही हातांच्या मदतीनंही फेटू शकता. जवळपास ४ मिनिटांच्या मेहनतीनंतर सायीपासून दूध वेगळं झालेलं दिसेल.
साय फेटल्यानंतर तेव्हा लोणी निघेल ते थेट गरम न करता साध्या पाण्यात घालून लोणी २ वेळा व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यामुळे लोण्यातील एक्स्ट्रा दूध आणि आंबटपणा निघून जाईल. गरम करताना तूप जळण्याचीही शक्यताही कमी असते.
धुतलेलं लोणी कढईत ठेवून गॅस सुरू राहू द्या. अडीच ते ३ मिनिटांचा वेळ लागेल. मध्यम आचेवर ढवळत राहा. त्यानंतर तूप तयार झालेलं दिसून येईल. या पद्धतीनं एलपीजी गॅसचीही बचत होईल आणि तासनतास वेळ वायाही जाणार नाही. सोनेरी रंगाचे तूप दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करा. तूप पूर्णपणे थंड होण्याआधी एका स्टिलच्या गाळणीनं गाळून घ्या. तूप नेहमी काचेच्या किंवा स्टिलच्या स्वच्छ भांड्यातच काढा.
