सकाळची झोप उघडताच अनेकांना चहाची तल्लफ लागते. मेंदूला चालना देण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी चहा महत्वाचा मानला जातो. ऑफिसला जाताना, मित्रांसोबत गप्पा मारताना प्रत्येकवेळी चहा हवाच. चहा फक्त एक ड्रिंक नाही तर इमोशन्स आहेत. (Tapri Style Perfect Tea Recipe)
पण घरी केलेला चहा परफेक्ट होत नाही कधी पांचट लागतो तर कधी त्यात साखरच जास्त होते असं अनेकांचं मत असतं.चहा पावडर, साखर आणि दूध घालण्याची योग्य वेळ माहित असायला हवी तरच चहा परफेक्ट, चविष्ट होतो. चहा करण्याची सोपी पद्धत पाहूया. ज्यामुळे चहा घट्ट बनेल आणि तुम्हाला खूप आवडेल. (How To Make Perfect Tea At Home)
बरेच लोक विचार करतात की चहा करणं खूपच सोपं आहे. पाणी, दूध, चहा पावडर घाला चहा तयार. पण चहा करणं एक कला आहे. व्यवस्थित स्टेप्स लक्षात ठेवून चहा केला तर चहाची चव अनेक पटींनी वाढते. तेच चुकीच्या पद्धतीनं चहा केला तर चव आणि मूड तिन्ही गोष्टींवर परीणाम होतो. (Tapri Style Tea Making Tips)
पहिली स्टेप- पाणी आणि चहा पावडर (When to add tea Powder?)
चहा करण्याची सुरूवात नेहमी पाण्यापासून होते. सगळ्यात आधी भांड्यात पाणी उकळवून घ्या. पाणी उकळल्यानंत त्यात चहा पावडल घाला. जवळपास २ ते ३ मिनिटं उकळल्यानंतर यात आलं किंवा वेलची घालू शकता. यामुळे चहाची चव बदलते आणि आणखी खास लागते.
दुसरी स्टेप - साखर (When to add Sugar In Tea?)
जास्तीत जास्त लोक ही चूक करतात ती म्हणजे दूध घातल्यानंतर साखर घालतात ही चुकीची पद्धत आहे. पाणी आणि चहा पावडर उकळल्यानंतर चहाचा फ्लेवर आल्यानंतर लगेच साखर घालावी आणि व्यवस्थित वितळवून घ्यावी.
तिसरी स्टेप- दूध घालणं (When to Add Milk In Tea?)
साखर वितळल्यानंतर त्यात दूध घाला. चहा मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा. हळूहळू चहाचे टेक्स्चर दाट होईल आणि टेस्ट संतुलित होईल. हे एक परफेक्ट चहाचं सिक्रेट आहे.
चहा करताना लोक ही चूक करतात (Commom Mistakes People Making While Making Tea)
पाण्यात एकत्र सर्व पदार्थ घालतात. त्यामुळे चहाची चव बिघडते. जास्तवेळ चहा उकळवतात ज्यामुळे चहाची चव कडवट होते आणि गॅस एसिडिटीची समस्यासुद्धा वाढते.काही लोक चहा कडक होण्यासाठी त्यात जास्त चहा पावडर घालतात. ज्यामुळे तब्येतीवरही चुकीचा परीणाम होतो. योग्य पद्धतीनं चहा केल्यास तुम्हाला फ्रेश वाटतं, मूड चांगला राहतो. पण चुकीच्या पद्धतीनं चहा केल्यास एसिडिटीसारख्या इतर पोटाच्या समस्या वाढतात. म्हणून योग्य प्रमाणातच चहा पावडर, दूध आणि साखरेचा वापर करा.