Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उचललं सफरचंद आणि खाल्लं असं करत असाल तर थांबा! पाहा सफरचंद खाण्याची योग्य वेळ

उचललं सफरचंद आणि खाल्लं असं करत असाल तर थांबा! पाहा सफरचंद खाण्याची योग्य वेळ

Right Time to Eat Apple : सफरचंदाचे सर्व फायदे मिळवण्यासाठी ते योग्य वेळी खाणं देखील तितकंच आवश्यक आहे. अशात जाणून घेऊया सफरचंद खाण्याची योग्य वेळ आणि त्याचे चमत्कारी फायदे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:32 IST2026-01-17T09:39:52+5:302026-01-17T17:32:54+5:30

Right Time to Eat Apple : सफरचंदाचे सर्व फायदे मिळवण्यासाठी ते योग्य वेळी खाणं देखील तितकंच आवश्यक आहे. अशात जाणून घेऊया सफरचंद खाण्याची योग्य वेळ आणि त्याचे चमत्कारी फायदे.

Right time to eat apples and its amazing benefits | उचललं सफरचंद आणि खाल्लं असं करत असाल तर थांबा! पाहा सफरचंद खाण्याची योग्य वेळ

उचललं सफरचंद आणि खाल्लं असं करत असाल तर थांबा! पाहा सफरचंद खाण्याची योग्य वेळ

Right Time to Eat Apple : सफरचंदाला सुपरफूड म्हटलं जातं आणि जगातील सर्वात आरोग्यदायी फळांमध्ये त्याचं नाव अग्रक्रमावर आहे. आजही घरातील मोठे लोक हेच सांगतात की,रोज एक संफरचंद खा आणि निरोगी रहा. कारण हे फळ खाऊन आरोग्यासंबंधी कितीतरी समस्या दूर होतात. सफरचंदामधील पोषक घटक हृदय, मेंदू, पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, सफरचंदाचे हे सर्व फायदे मिळवण्यासाठी ते योग्य वेळी खाणं देखील तितकंच आवश्यक आहे. अशात जाणून घेऊया सफरचंद खाण्याची योग्य वेळ आणि त्याचे चमत्कारी फायदे.

सफरचंद खाण्याची योग्य वेळ

सकाळी उपाशीपोटी

सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामधील फायबर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं आणि पचनक्रिया सुधारतं.

नाश्त्यात खा

नाश्त्यासोबत सफरचंद खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

वर्कआउटपूर्वी

व्यायाम करण्यापूर्वी सफरचंद खाल्ल्यास त्यातील नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला त्वरित ऊर्जा देतात.

रात्री खाणे टाळा

रात्री सफरचंद खाल्ल्यास पचन स्लो होतं तसेच गॅस किंवा आम्लपित्तासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दिवसा सफरचंद खाणं अधिक फायदेशीर ठरतं.

काहींना उपाशीपोटी खाणं नुकसानकारक

अ‍ॅसिडिटी किंवा गॅस असलेल्यांनी

सफरचंदामध्ये फायबर आणि नॅचरल शुगर असते. जी काही लोकांमध्ये अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण करू शकते. जर पोटात आधीच जळजळ किंवा गॅसची समस्या असेल तर उपाशीपोटी सफरचंद खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

कमजोर पचन तंत्र

ज्या लोकांचं पचन तंत्र कमजोर आहे त्यांनी उपाशीपोटी सफरचंदाचं सेवन करू नये. जर या लोकांनी उपाशीपोटी सफरचंद खाल्लं तर पोटदुखी किंवा पोटात जडपणा निर्माण होऊ शकतो.

डायबिटीसचे रूग्ण

सफरचंदामध्ये आढळणारं फ्रक्टोज आणि ग्लूकोजने उपाशीपोटी ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. डायबिटीसच्या रूग्णांनी हे फळ उपाशीपोटी खाणं टाळलं पाहिजे.

आयर्रिटेबल बाउल सिंड्रोम

सफरचंदामध्ये फोडमॅप्स नावाचं तत्व असतं. जे आयर्रिटेबल बाउल सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये पोट फुगणे, गॅस आणि इतर समस्या निर्माण करू शकतं.

Web Title : सेब खाने का सही समय: सर्वोत्तम लाभ के लिए सही समय पर खाएं।

Web Summary : सेब को सही समय पर खाने से स्वास्थ्य लाभ अधिकतम होते हैं। सुबह या व्यायाम से पहले सेवन पाचन में मदद करता है और ऊर्जा बढ़ाता है। रात में खाने से बचें। कुछ स्थितियों में सावधानी आवश्यक है।

Web Title : Best time to eat apples: Maximize benefits by eating at the right time.

Web Summary : Eating apples at the right time maximizes health benefits. Morning or pre-workout consumption aids digestion and boosts energy. Avoid eating at night. Certain conditions require caution.