Lokmat Sakhi >Food > गरमागरम तांदळाची टम्म फुल्लेली पुरी करायला अगदीच सोपी, लहान मुले तर आवडीने खातील

गरमागरम तांदळाची टम्म फुल्लेली पुरी करायला अगदीच सोपी, लहान मुले तर आवडीने खातील

rice puri is very easy to make, even kids will love it : तांदळाच्या पिठाची पुरी करायला फार सोपी. अगदी खमंग पुरी करायची रेसिपी पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 20:07 IST2025-04-21T20:05:45+5:302025-04-21T20:07:34+5:30

rice puri is very easy to make, even kids will love it : तांदळाच्या पिठाची पुरी करायला फार सोपी. अगदी खमंग पुरी करायची रेसिपी पाहा.

rice puri is very easy to make, even kids will love it. | गरमागरम तांदळाची टम्म फुल्लेली पुरी करायला अगदीच सोपी, लहान मुले तर आवडीने खातील

गरमागरम तांदळाची टम्म फुल्लेली पुरी करायला अगदीच सोपी, लहान मुले तर आवडीने खातील

घरी आपण बरेचदा पुरी करतो. कधी तरी चपाती नको म्हणून मग पुरी आपण तळतो.( rice puri is very easy to make, even kids will love it.) मस्त खमंग खुसखुशीत पुरी खाताना किती खातो याचे भानच राहत नाही. तांदळाच्या पिठाच्या अगदी खमंग अशा पुऱ्या करता येतात. करायला अगदीच सोप्या आहेत. भाजीशी लाऊन खा किंवा मग नुसती पुरी खा. चवीला फारच छान लागते. ( rice puri is very easy to make, even kids will love it.)अगदी छान फुलतेही तसेच तळणी वापरायची नसेल तर पुरीऐवजी तांदळाची पोळीही करता येते. 

साहित्य
तांदळाचे पीठ, मीठ, पाणी, तेल, कोथिंबीर, जिरे, ओवा

कृती
१. एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करत ठेवा. पाणी जरा कोमट झाल्यावर त्यामध्ये चमचाभर ओवा घाला. नंतर चमचाभर जिरे घाला. तसेच चवीपुरते मीठ घाला. चमचाभर तेल घाला. पाणी जरा छान उकळू द्या. 

२. कोथिंबीर एकदम बारीक चिरुन घ्या. उकळत्या पाण्यामध्ये कोथिंबीर टाका. झाकण ठेवा आणि दोन मिनिटे कोथिंबीर उकळू द्या. शेवटी वाटी भर तांदळाचे पीठ त्यामध्ये घाला. व्यवस्थित ढवळा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. सतत ढवळा. हळूहळू पीठ घट्ट व्हायला लागेल. पाणी पूर्णपणे पिठामध्ये जिरल्यावर गॅस बंद करा. एका परातीत ते पीठ काढा आणि जरा कोमट होऊ द्या. पीठ जरा गार झाल्यावर हाताने ते छान मळून घ्या. मस्त मऊ करुन घ्या. 

३. बोटांना तेल लावा आणि मळलेल्या पीठाच्या लहान लाट्या करुन घ्या. पुरीसाठी जशा लाट्या करता अगदी तशाच लाट्या करा. अति जाड नको आणि अति पातळही नको. मध्यम आकाराच्या लाट्या करुन घ्या.

४. एका पोलपाटाला थोडं तेल लावा. त्यावर एक एक करुन लाट्या लाटून घ्या. मस्त गोल पुऱ्या लाटा. 

५. कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल छान तापल्यावर त्यामध्ये एक एक करुन पुरी सोडा आणि छान खमंग तळून घ्या. अगदी कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी तांदळाची पुरी  गरमागरम खा.   

Web Title: rice puri is very easy to make, even kids will love it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.