संध्याकाळच्या वेळी काहीतरी कुरकुरीत आणि चविष्ट खाण्याची इच्छा झाली की तांदळाचे पॉपकॉर्न परफेक्ट रेसिपी आहे . आकाराने छोटे असल्यामुळे हे पदार्थ दिसायलाही आकर्षक वाटतात आणि खायलाही मजा येते. बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊसर लागणारा हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.(Rice Popcorn Recipe : easy to make and very crunchy , children will love it ) विशेष म्हणजे हा पदार्थ मुलांसाठी खूपच मजेशीर ठरतो. छोट्या छोट्या गोळ्यासारखे दिसत असल्यामुळे मुलं आवडीने खातात. शाळेतून आल्यावर, संध्याकाळच्या खाऊसाठी किंवा पावसाळ्यात गरमागरम चहासोबत हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अनेक घरांमध्ये हा पदार्थ मिनी भजी म्हणून ओळखला जातो तर काही जण त्याला तांदळाचे पॉपकॉर्न म्हणतात. पाहा कसा करायचा.
साहित्य
तांदूळ, बटाटा, कांदा, चिलीफ्लेक्स, लसूण, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची, मीठ , जिरे, तेल, आलं
कृती
१. बटाटा उकडून घ्यायचा. त्याची सालं काढून घ्यायची. तांदूळ किमान तासभर भिजवायचे. भिजवून झाल्यावर त्यातील पाणी काढून टाकायचे आणि थोडावेळ तांदूळ वाळवायचे. वाळल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटून घ्यायचे. जरा ओलसर अशी पावडर वाटली जाते.
२. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या. त्यात एक काश्मीरी लाल मिरची घ्यायची. त्यात थोडं आलं घालायचं. त्यात सगळे पदार्थ एकत्र करुन वाटून घ्यायचे. त्याची पेस्ट तयार होते. तांदूळाचे वाटण एका खोलगट भांड्यात घ्यायचे. त्यात कुस्करलेला बटाटा घालायचा. तयार केलेली पेस्ट घालायची.
३. त्यात थोडे चिलिफ्लेक्स घालायचे. तसेच चवीनुसार मीठ घालायचे. थोडं जिरं घाला आणि बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला. हाताने सगळं एकजीव करुन घ्या. मिक्स करा आणि त्याचे पीठ मळा. घट्ट नाही सैलसर पातळच होते. पाणी वगैरे घालू नका. तांदूळ्याचा ओलाव्यातच मळा.
४. कढईत तेल गरम करायचे. तेल तापल्यावर त्यात तयार पीठाचे लहान गोळे सोडायचे. अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. अगदी कुरकुरीत होतात. त्यात सोडा किंवा इतर काही घालावे लागत नाही.
Web Summary : Enjoy crispy rice popcorn, a delightful snack made with rice, potato, and spices. Easy to make, it's perfect for kids and tea time. Fry until golden and crunchy.
Web Summary : चावल, आलू और मसालों से बने कुरकुरे चावल के पॉपकॉर्न का आनंद लें। बनाने में आसान, यह बच्चों और चाय के समय के लिए एकदम सही है। सुनहरा और कुरकुरा होने तक तलें।