सकाळच्यावेळी नाश्ता (Breakfast Ideas) काय बनवायचा असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो. इडली, डोसा असे पदार्थ सर्वांनाच नाश्त्याला खायला आवडतात. पण दळणं, आंबवणं अशी प्रक्रिया करावी लागते. यात बराचवेळ जातो. लगेचच्या लगेच डोसा करणं शक्य नसतं (Rice Flour Dosa Recipe). अशावेळी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करून फक्त १० ते १५ मिनिटांत हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत, जाळीदार डोसा बनवू शकता. तांदळाच्या पीठापासून घावणेही तयार करता येतात. (How To Make Rice Dosa Instantly)
तांदळाचा डोसा करण्यासाठी पूर्वतयार कशी करावी?
हा डोसा करण्यासाठी १ वाटी तांदळाचे पीठ, २ चमचे रवा, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, २ ते ३ हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी लागेल. जर तुम्हाला डोसा अधिक चवदार, चविष्ट बनवायचा असेल तर त्यात थोडं जीरं आणि किसलेलं आलं देखिल घालू शकता.
पोहे कधी गचके कधी खूप कोरडे होतात? ६ चुका टाळा, मऊसूत, चविष्ट होतील बटाटे पोहे
तांदळाचा डोसा करण्याची पद्धत
सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करून घ्या. त्यात थोडं थोडं पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा. हे मिश्रण नेहमीच्या डोश्याच्या पिठापेक्षा पातळ असायला हवं. साधारणपणे ताकासारखी सुसंगता असेल तर परफेक्ट डोसा बनतो. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, जीरं आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. जेणेकरून रवा व्यवस्थित फुलून येईल.
डोसा भाजण्याची पद्धत
गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा. तव्याला थोडं तेल लावून पुसून घ्या. आता पिठाचे मिश्रण ढवळून घ्या आणि बाहेरच्या बाजूनं आतल्या बाजूला गोलाकार पद्धतीनं तव्यावर सोडा. तवा गरम असल्यामुळ पिठाला आपोआप छान जाळी पडते. मध्यम आचेवर डोसा भाजून घ्या.
थंडीत करा उडुपीस्टाईल गरमागरम रस्सम; मऊ भातासोबत खा चवदार रस्सम-तोंडाला येईल चव
कडेकडेनं थोडं तेल सोडा जेणेकरून डोसा कुरुकुरीत होईल. एका बाजूनं सोनेरी रंग आला की डोसा अलगद काढून घ्या. हा डोसा उलटण्याची गरज नसते पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोन्ही बाजूंनी भाजू शकता. गरमागरम डोसा ओल्या नारळाची चटणी, बटाट्याची भाजी किंवा सांबरसोबत खायला तयार आहे.
Web Summary : Make instant, crispy dosa with rice flour in minutes! Mix rice flour, semolina, and spices. Pour onto a hot pan for a delicious, quick breakfast. Serve with chutney or sambar.
Web Summary : चावल के आटे से मिनटों में कुरकुरा डोसा बनाएं! चावल का आटा, सूजी और मसाले मिलाएं। स्वादिष्ट, झटपट नाश्ते के लिए गरम तवे पर डालें। चटनी या सांभर के साथ परोसें।