Join us
Daily Top 2Weekly Top 5

तळलेल्या तेलात पुन्हा पुन्हा पदार्थ तळणं, तेच तेल भाजीसाठी वापरल्यानं होऊ शकतो कॅन्सर कारण... डॉक्टरांचा इशारा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:15 IST

Deep-Fry Oil Side Effects : खायचं तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने तब्येतीचं फार मोठं नुकसान होतं. आपणही तेल पुन्हा पुन्हा गरम करत असाल तर याने काय समस्या होऊ शकते हे माहीत असणं आवश्यक आहे. 

Deep-Fry Oil Side Effects : जास्तीत जास्त घरांमध्ये किंवा हॉटेल्समध्ये डीप फ्राय केल्यानंतर शिल्लक राहिलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं. इतकं महाग तेल फेकायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडतो. मोठमोठ्या फास्ट फूड स्टॉलवर हे तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं. पण ही सवय आरोग्याचं फार मोठं नुकसान करू शकते. डॉ. प्रियंका सेहरावत सांगतात की, खायचं तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने तब्येतीचं फार मोठं नुकसान होतं. आपणही तेल पुन्हा पुन्हा गरम करत असाल तर याने काय समस्या होऊ शकते हे माहीत असणं आवश्यक आहे. 

तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने काय होतं?

डॉ. सेहरावत यांच्यानुसार, जेव्हा डीप फ्राईंगसाठी वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम केलं जातं, तेव्हा ते तुटू लागतं आणि त्यात घातक रसायनं तयार होतात. अलिकडेच जयपुरच्या एका फास्ट फूड आउटलेटवर करण्यात आलेल्या आलेल्या सर्व्हेचा हवाला त्या सांगतात की, तेल इतक्यांदा गरम करण्यात आलं की, ते पूर्णपणे काळं झालं होतं. तेलाचा रंग काळा झाला म्हणजे ते बेकार झालं. 

पुन्हा पुन्हा गरम करण्यात आलेल्या तेलातून कार्सिनोजेनिक, टोटल पोलर, पॉलीसाइक्लिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन (PAHs), ट्रान्स फॅट आणि फ्री रॅडिकल्ससारखे घातक तत्व निघतात. जे शरीराचं गंभीरपणे नुकसान करतात. हे सगळे तत्व शरीरात सूज, कोशिकांचं नुकसान आणि डीएनए डॅमेज यांसारख्या समस्या निर्माण करतात.

कॅन्सरचा वाढतो धोका 

पुन्हा पुन्हा गरम केलेलं तेल वापरल्याने कॅन्सरचा धोका तर वाढतोच, सोबतच हृदयाचं आरोग्या देखील बिघडतं. अशा तेलात बनवलेले पदार्थ नियमित खाल्ल्यास बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू शकतं. धमण्यांमध्ये प्लाक जमा करण्याचा धोका वाढतो. हार्ट अॅटॅक आणि कार्डियोवस्कुलर आजारांचा धोका वाढू शकतो. या विषारी तत्वांमुळे कॅन्सर आणि हार्ट डिजीजचा धोका अनेक पटीने वाढू शकतो. 

सुरक्षित पर्याय काय?

पैसे वाचवण्यासाठी तेल पुन्हा पुन्हा डीप-फ्रायसाठी वापरणं योग्य नाही. जर आपल्याला तेल फेकायचं नसेल तर कमी प्रमाण आणि सुरक्षित पद्धत वापरू शकता. यासाठी तेल चांगलं गाळून स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा. १ ते २ दिवसात या तेलाचा हलका वापर करा, जसे की तडका देण्यासाठी वापरू शकता. हे तेल पुन्हा डीप फ्राय करणं टाळा. कारण जास्त तापमानावर तेलाची क्वालिटी कमी होते आणि त्यात विषारी तत्व तयार होतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Reheating Oil: A Major Cancer Risk, Doctors Warn.

Web Summary : Reheating cooking oil releases harmful chemicals, increasing cancer and heart disease risks. Repeatedly heated oil contains carcinogens which damage cells. Use fresh oil or reuse filtered oil for light tasks only. Avoid deep-frying with reused oil to protect your health.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य