Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेफ रणवीर ब्रारने सांगितली थेंबभरही तेल न वापरता स्वयंपाक करण्याच्या ट्रिक्स! पैशांची बचत - चव जबरदस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 11:01 IST

reduce oil in cooking tips : healthy cooking tips by Ranveer Brar : how to cook food with less oil : कमीतकमी तेलात किंवा अगदी 'झिरो ऑईल' वापरून पदार्थ कसा करायचा याच्या ५ ट्रिक्स...

आजकाल आरोग्यदायी लाईफस्टाईलकडे लोकांचा वाढता कल दिसून येत आहे. वजन कमी करायचं असेल किंवा फिट राहायचं असेल, तर आहारात तेलाचे प्रमाण कमी ठेवणे खूप महत्त्वाचे असते. अनेकांना वाटते की कमी तेलात स्वयंपाक केल्यास पदार्थांची चव कमी होते, पण प्रत्यक्षात योग्य पद्धतीने स्वयंपाक केला तर कमी तेलातही पदार्थ तितकेच चविष्ट बनू शकतात. एखाद्या पदार्थात जितकं जास्त तेल, तितकीच जास्त चांगली चव... हा समज आता जुना झाला आहे! सुप्रसिद्ध मास्टर शेफ रणवीर बरार सांगतात की, चविष्ट जेवणासाठी खूप तेलाची नाही, तर अगदी कमी तेल वापरुन देखील तितकाच चविष्ट पदार्थ तयार करता येऊ शकतो. कमीत कमी तेलात किंवा अगदी 'झिरो ऑईल' वापरून पदार्थ कसा खुलवायचा, याच्या खास ट्रिक्स त्यांनी शेअर केल्या आहेत(reduce oil in cooking tips).

सुप्रसिद्ध शेफ रणवीर बरार यांनीही कमी तेल वापरून किंवा अगदी तेल न वापरता स्वयंपाक करण्याच्या काही सोप्या आणि उपयुक्त ट्रिक्स सांगितल्या आहेत. या टिप्समुळे फक्त आरोग्यच चांगले राहत नाही, तर तेलाचा वापर कमी झाल्यामुळे पैशांचीही बचत होते. शिवाय अशा पद्धतीने बनवलेले पदार्थ वेटलॉससाठी देखील (tips to reduce oil in cooking for better health) फायदेशीर ठरू शकतात. कमी तेलात स्वयंपाक करण्याच्या सोप्या आणि फायदेशीर ट्रिक्स पाहूयात... 

कमी तेलात किंवा तेल न वापरता स्वयंपाक कसा करायचा ? 

१. तेल ठेवण्यासाठी लहान कंटेनरचा वापर करा (Store Oil in Small Container) :- जर तुम्हाला रोजच्या जेवणातील तेलाचे प्रमाण कमी करायचे असेल, तर सर्वातआधी तेल ठेवण्यासाठी थेट मोठा डबा वापरण्याऐवजी ते एका लहान कंटेनरमध्ये काढून ठेवा. जेव्हा तेल लहान डब्यात असते, तेव्हा प्रत्येकवेळी आपण ते मर्यादित प्रमाणातच बाहेर काढतो, ज्यामुळे गरजेपेक्षा जास्त तेल वापरण्याच्या सवयीला आळा बसतो. मोठ्या डब्यातून चमच्याने तेल काढताना अनेकदा अंदाज चुकून जास्त तेल वापरले जाते. मात्र, लहान कंटेनरमुळे तेलाची बचत होते आणि हळूहळू ही सवय एका हेल्दी कुकिंग स्टाईलमध्ये रूपांतरित होते. ही छोटीशी सवय तुमच्या आरोग्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते, ज्यामुळे वेटलॉस करण्यास देखील मोठी मदत मिळते.

उन्हाळ्यात किचनमध्ये स्वयंपाक म्हणजे शिक्षा, १० टिप्स- किचन राहील थंड-घामाघुम न होता करा स्वयंपाक...

२. अरुंद तोंडाच्या कंटेनरचा वापर करा (Use Narrow-Mouthed Container) :- स्वयंपाकातील तेलाचे प्रमाण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अरुंद (अरुंद तोंड असलेल्या) कंटेनरचा वापर करणे. जेव्हा तुम्ही रुंद तोंडाच्या डब्यातून तेल काढता, तेव्हा अनेकदा गरजेपेक्षा जास्त तेल चमच्यात येते आणि पर्यायाने ते थेट कढईत किंवा पॅनमध्ये जाते. याउलट, अरुंद किंवा अरुंद तोंड असलेल्या कंटेनरमधून तेल अगदी हळूहळू आणि धार धरून बाहेर पडते, ज्यामुळे तेलाच्या प्रमाणावर तुमचे उत्तम नियंत्रण राहते. ज्यांना हेल्दी ईटिंग करायच आहे, त्यांच्यासाठी ही सवय अत्यंत फायदेशीर ठरते. अशा प्रकारे तुम्ही नकळत होणारा तेलाचा अतिवापर टाळू शकता.

खा फळं बिंधास्त वाढणार नाही शुगर-फळांवर ‘हा’ मसाला चिमुटभर भुरभुरायला मात्र विसरु नका...

३. कमी तेलात फोडणी द्या (Use Less Oil For Tadka) :- फोडणी हा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे, पण फोडणीसाठी गरजेपेक्षा जास्त तेल वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फोडणी देताना नेहमी फक्त १ ते २ चमचे तेल वापरण्याचा प्रयत्न करा. जिरे, मोहरी, कढीपत्ता किंवा लसूण यांसारखे मसाले मंद आचेवर हलके परतून घ्या, जेणेकरून त्यांचा स्वाद अन्नात पूर्णपणे उतरेल. कमी तेलातही अन्नाची पारंपारिक चव टिकवून ठेवणे शक्य आहे. लो-फॅट कुकिंगची (Low-fat cooking) ही सवय तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. रोजच्या जेवणातील हा छोटासा बदल दीर्घकाळासाठी मोठा सकारात्मक परिणाम दाखवू शकतो.

४. फोडणीत पाण्याचा वापर करा (Add Water in Tadka) :- जर एखाद्या रेसिपीमध्ये फोडणीसाठी जास्त तेल वापरण्याची गरज भासत असेल, तर तुम्ही एक 'हेल्दी ट्रिक' वापरू शकता, ती म्हणजे पाण्याचे हबके मारणे. जेव्हा तुम्ही मोहरी किंवा जिरे तेलात टाकून फोडणी देता, तेव्हा त्यात थोडेसे पाणी टाका आणि त्यानंतर आले, लसूण, कांदा किंवा इतर मसाले घाला. पाण्यामुळे मसाले जळत नाहीत आणि कमी तेलातही ते व्यवस्थित शिजतात, ज्यामुळे अन्नाची चव तशीच टिकून राहते. ही पद्धत विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा हेल्दी डाएट फॉलो करत आहेत. शिवाय, अशा प्रकारे कमी तेलात बनवलेले अन्न पचायला देखील हलके असते.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज... 

५. भाजीतील अतिरिक्त तेल काढून टाका (Remove Excess Oil) :- भाजी तयार झाल्यानंतर जे तेल वर तरंगताना दिसते, ते चमच्याच्या साहाय्याने बाहेर काढून टाका. जेव्हा आपण रस्सा भाजी किंवा ग्रेव्हीचा एखादा पदार्थ बनवतो, तेव्हा शिजल्यानंतर अनेकदा तेल वरच्या बाजूला जमा होते. हे अतिरिक्त तेल जेवण केवळ तेलकट बनवत नाही, तर शरीरात विनाकारण जास्त फॅट वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे भाजी शिजल्यानंतर जर वर तेल तरंगताना दिसले, तर ते चमच्याने किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने वेगळे करून घ्या. ही सवय हळूहळू तुमच्या शरीरातील तेलाचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे वजन घटण्यास मदत होते आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते.

English
हिंदी सारांश
Web Title : Chef Ranveer Brar's tricks for oil-free cooking: Save money, enhance taste.

Web Summary : Chef Ranveer Brar shares tips for cooking with less or no oil. Use small containers, narrow-mouthed containers, and water in tadka. Remove excess oil after cooking. These methods promote health, save money, and aid in weight loss.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स