Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण म्हणतं रेड सॉस पास्ता करणं अवघड आहे? ही घ्या सोपी रेसिपी- १५ मिनिटांत पास्ता तयार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2025 14:18 IST

Red Sauce Pasta Recipe: ही रेसिपी एवढी सोपी आहे की अगदी लहान मुलंही रेड सॉस पास्ता करून खाऊ शकतात...(how to make red sauce pasta at home?)

ठळक मुद्देघरच्याघरी अगदी कमीतकमी पैशांत आणि कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्स न वापरता तुम्ही रेड सॉस पास्ता झटपट करू शकता

पास्ता हा लहान मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ. त्यात कित्येक वेगवेगळे प्रकार असले तरी मुलांना रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता हे दोन प्रकार विशेष आवडतात. आता यापैकी रेड सॉस पास्ता घरच्याघरी कसा तयार करायचा ते पाहूया.. एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन रेड सॉस पास्ता ऑर्डर केला तर त्यासाठी नक्कीच ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात. पण त्याउलट घरच्याघरी अगदी कमीतकमी पैशांत आणि कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्स न वापरता तुम्ही रेड सॉस पास्ता झटपट करू शकता (how to make red sauce pasta at home?). तो कसा करायचा ते पाहूया..(cooking tips for tomato cheese red sauce pasta recipe)

रेड सॉस पास्ता रेसिपी

 

साहित्य

उकडून घेतलेला पास्ता ३ ते ४ कप

५ मध्यम आकाराचे टोमॅटो

१ बारीक चिरलेला कांदा आणि १ बारीक चिरलेली सिमला मिरची

त्वचेच्या सौंदर्यासाठी केशर कसं वापरावं तेच कळेना? २ सोपे उपाय- चेहऱ्यावर येईल सोनेरी ग्लो

८ ते १० लसूण पाकळ्या

१ टीस्पून मिरेपूड, ओरिगॅनो

अर्धी वाटी चीज, अर्धी वाटी फ्रेश क्रिम

चवीनुसार मीठ आणि तेल

कृती

रेड सॉस पास्ता तयार करण्यासाठी सगळ्यात आधी पास्ता वेगळा शिजवून घ्या.

 

यानंतर एका पसरट कढईमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोठमोठ्या आकारात कापलेले टाेमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि सिमला मिरची तसेच लसूण पाकळ्या घाला. त्यात थोडं मीठ घालून कढईवर झाकण ठेवा आणि भाज्यांना वाफ येऊ द्या.

स्टायलिश लूक देणाऱ्या अजरख प्रिंट ब्लाऊजचे लेटेस्ट डिझाईन्स! पार्टीपासून ऑफिसपर्यंत कुठेही वापरा, स्मार्ट दिसाल

चांगली वाफ आल्यानंतर टोमॅटोची सालं काढून टाका आणि कढईतले सगळे पदार्थ मॅश करून एकजीव करा. त्यानंतर त्यात अर्धी वाटी चीज, अर्धी वाटी फ्रेश क्रिम आणि थोडं दूध घालून सगळं एकजीव करा. आता शेवटी यात मीरेपूड, ओरिगॅनो आणि चवीनुसार मीठ तसेच लाल तिखट घाला. यामध्ये उकडलेला पास्ता घालून सगळं हलवून एकत्र केलं की सुपर चिझी असा रेड सॉस पास्ता तयार.. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Red Sauce Pasta Recipe: Ready in Just 15 Minutes!

Web Summary : Red sauce pasta, a kid favorite, can be easily made at home. Skip expensive restaurants! This recipe uses simple ingredients, no preservatives, for a quick, cheesy pasta dish. Boil pasta, sauté tomatoes, onion, and capsicum. Add cheese, cream, spices, and mix well. Enjoy!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स