Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकदाच पीठ तयार करा; नाश्त्याला ४-५ पदार्थ पटकन होतील, इडली, डोसा काहीही करून खा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 17:22 IST

Recipe To Make All In One Healthy Batter : मिलेट्स आणि सोयाबीनचं मिश्रण प्रोटीन, फायबर्स आणि कॅल्शियमनं परिपूर्ण असते. ज्यांना आपली गट हेल्थ चांगली ठेवायची आहे त्यांच्यासाठी हे बॅटर उत्तम ठरते.

सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. काहींना इडली हवी असते तर काहींना डोसा. सोशल मीडियावर हरीणी वेंकट यानी एक ऑल इन वन हेल्दी बॅटर तयार करण्याची पद्धत सांगितली आहे. हे बॅटर फक्त स्वादीष्ट नसते तर आरोग्याचा खजिनासुद्धा आहे. (Recipe To Make All In One Healthy Batter)

मिलेट्स आणि सोयाबीनचं मिश्रण प्रोटीन, फायबर्स आणि कॅल्शियमनं परिपूर्ण असते. ज्यांना आपली गट हेल्थ चांगली ठेवायची आहे त्यांच्यासाठी हे बॅटर उत्तम ठरते. हे बॅटर घरीच सोप्या पद्धतीनं करून तुम्ही मऊसूत इडली, डोसे, उत्तपम आणि पनियारम असे विविध पदार्थ बनवू शकता. हे पीठ तयार करण्यासाठी तुम्हाला १ कप तांदूळ, १ कप उडीदाची डाळ-प्रोटीनसाठी, अर्धा कप सोयाबीन,  १ कप नाचणी, १ कप ज्वारी लागेल.

सगळ्यात आधी सर्व साहित्य तांदूळ, डाळ, सोयाबीन आणि मिलेट्स एका मोठ्या भांड्यात घ्या. २ ते ३ पाण्यानी व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यानंतर पाण्यात घालून ६ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवा. सोयाबीन आणि मिलेट्स फुलायला थोडा वेळ लागतो. यासाठी कमीत कमी ६ तास भिजवणं गरजेचं आहे. जेणेकरून वाटताना बॅटर एकदम स्मूद होईल.

भिजवल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका. पुन्हा एकदा ताज्या पाण्यानं धुवा. मिक्सर जारमध्ये घालताना गरजेनुसार थोडं थोडं पाणी मिसळा. हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त जाड असणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. नंतर ८ ते १२ तासांसाठी झाकून एखाद्या गरम ठिकाणी ठेवा. आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान यात प्रोबायोटिक्स तयार होतील. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास मदत होईल.

जर तुम्हाला या मिश्रणापासून लगेच काही करायचं नसेल तर फ्रिजमध्ये ठेवून देऊ शकता. फर्मेंट केल्याशिवाय हे बॅटर ४ ते ५ दिवस आरामात चांगले राहते. जेव्हा तुम्हाला इडली किंवा डोसा करायचा असेल तर गरजेनुसार बॅटर बाहेर काढून वापरू शकता. 

नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही या पिठापासून बनवू शकता. सॉफ्ट इडलीसुद्धा बनवता येते. यात मीठ घालून इडल्या छान करतात. तर तव्यावर थोडं तूप किंवा तेल लावून कुरकुरीत डोसा करता येतो. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून  उत्तप्पम करता येते.

English
हिंदी सारांश
Web Title : One batter, multiple breakfast options: Idli, Dosa, and more easily made.

Web Summary : Tired of breakfast dilemmas? This all-in-one healthy batter, packed with millets and soy, makes idli, dosa, uttapam and more. Soak grains, grind, ferment and enjoy versatile, nutritious meals all week.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न