आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक जॅममध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात. हे चांगले दिसतात पण लहान मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. मुलांना गोड आणि चविष्ट पदार्थ खाण्याची खूप आवड असते आणि बऱ्याचदा त्यांना ब्रेडवर जॅम लावून खाण्याची सवय असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मुलांना निरोगी आणि चांगला पर्याय द्यायचा असेल तर घरी बनवलेला 'अॅपल जॅम' सर्वोत्तम आहे. ज्यामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्ज टाकण्याची गरज नाही.
सफरचंद का आहे खास?
सफरचंद हे फक्त एक फळ नाही तर आरोग्यासाठी खजिना आहे. फायबर, व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पोट निरोगी राहतं आणि एनर्जी मिळते.
अॅपल जॅम बनवण्यासाठी लागणारं साहित्य
ताजे सफरचंद - ४ ते ५ (मध्यम आकाराचे)
साखर - १ कप (तुम्हाला हवं असल्यास साखरेचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता)
लिंबाचा रस - १ ते २ चमचे
पाणी - १/२ कप
बनवण्याची पद्धत
- सर्वप्रथम सफरचंद चांगलं धुवून सोलून घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा.
- आता एका पॅनमध्ये सफरचंद आणि अर्धा कप पाणी घाला आणि मंद आचेवर शिजवा.
- सफरचंद मऊ झाल्यावर ते मॅश करा किंवा हवं तर हँड ब्लेंडरने प्युरी बनवा.
- आता त्यात साखर घाला आणि चांगली मिसळा. मध्यम आचेवर सतत ढवळत शिजवा.
- जॅम घट्ट होऊ लागला की, त्यात लिंबाचा रस घाला. यामुळे जॅमची चव आणखी चांगली होईल आणि तो लवकर खराब होणार नाही.
- जॅम तयार करून झाल्यानंतर तो थंड होऊ द्या आणि स्वच्छ काचेच्या बरणीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
फायदे
- मुलांना निरोगी आणि चविष्ट नाश्ता मिळेल.
- प्रिझर्व्हेटिव्ह्जसारख्या बाहेरील उत्पादनांपासून संरक्षण होईल.
- तुम्हाला सफरचंद न्यूट्रिशनचा फायदा मिळेल.
- घरी बनवलेलं असल्याने १००% सुरक्षित आहे.
- संपूर्ण कुटुंबासाठी चविष्ट आणि निरोगी पर्याय आहे.
टिप्स
नेहमी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने जॅम बाहेर काढा जेणेकरून तो लवकर खराब होणार नाही. एकदा बनवल्यानंतर तो फ्रीजमध्ये २ ते ३ आठवडे सहज टिकू शकतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा मुलांना गोड काहीतरी खावंस वाटेल तेव्हा बाजारातून विकत घेतलेला जॅम देण्याऐवजी त्यांना घरी बनवलेला आरोग्यदायी जॅम द्या. ज्यामुळे लहान मुलंही पटकन खूश होतील.