साऊथ इंडियन पदार्थ भारतात फार प्रसिद्ध आहेत. जागोजागी खाल्ले जातात. त्यापैकीच एक म्हणजे गन पावडर. ज्याला पुडी म्हटले जाते. हा पदार्थ दक्षिण भारतातील स्वयंपाकघरात रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. (Recipe for making traditional gunpowder or podi, as Amma makes it at every home in South India, along with Idli-Dosa )नाव ऐकायला जरी रौद्र वाटत असले, तरी ती अत्यंत सुगंधी, पौष्टिक आणि चविष्ट मसाल्यांची पूड असते. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र आणि केरळ अशा विविध ठिकाणी विविध प्रकारांनी ही पुडी केली जाते आणि प्रत्येक घराची रेसिपी वेगळी असते. त्यापैकीच एक सामान्य आणि झटपट करता येणारी रेसिपी पाहा. करायला अगदी सोपी आहे. तसेच इडली, डोसा, मेदूवडा, भात सगळ्यासोबत ही खाता येते. एकदम मस्त लागते. पाहा कशी करायची.
साहित्य
अख्खी पांढरी उडदाची डाळ, चणाडाळ, तेल, पांढरे तीळ, धणे, जिरे, काश्मीरी लाल मिरची, लसूण, कडीपत्ता, चिंच, मीठ, हिंग
कृती
१. एका कढईत अर्धी वाटी अख्खी पांढरी उडदाची डाळ घ्यायची. त्यात अर्धी वाटी चणाडाळ घालायची. दोन्ही पदार्थ छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. छान भाजून झाल्यावर गार करत ठेवायचे. कढईत चमचाभर तेल घ्यायचे. त्यात दोन ते तीन चमचे जिरे घालायचे. जिरे परतून घ्यायचे. त्यात तीन ते चार चमचे धणे घालायचे आणि धणेही परतून घ्यायचे. दोन्ही पदार्थ छान परतायचे.
२. त्यात चार ते पाच काश्मीरी लाल मिरची घालायच्या. ते ही परतायचे. त्यात थोडे पांढरे तीळ घालायचे, छान परतायचे. मंद आचेवर परतायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याही परतायच्या. नंतर कडीपत्ता घालायचा आणि परतून घ्यायचा. लसूण जास्त घ्यायचा लसणाची चव छान येते. थोडी चिंच घालायची आणि परतायची. परतून झाल्यावर सारे पदार्थ गार करत ठेवायचे.
३. गार झाल्यावर त्यात चवीपुरते मीठ घालायचे. तसेच थोडे हिंग घालायचे. परतलेल्या डाळी आणि हे मिश्रण एकत्र करायचे. मस्त वाटून घ्यायचे. छान सरसरीत पूड तयार करायची. मस्त चविष्ट अशी चटणी तयार होते.
