मूगडाळीचा समावेश आहारात असायला हवा. ही डाळ पचायला हलकी आणि चवीला छान असते. मुगडाळीचे वरण तसेच खिचडी तुम्ही कायमच खात असाल. पण मुगडाळीची भाजीही करता येते. मुगडाळीतून मिळणारे प्रोटीन, फायबर आणि सौम्य उष्णता शरीराला ऊर्जा देतात. ही भाजी झटपट होते आणि करायलाही सोपी असते. (Recipe for making spicy dry moong dal sabzi - This recipe is a must-try as it is quick and easy to make with minimal ingredients.)त्यामुळे अचानक कोणी घरी जेवायला आले तर हा पदार्थ करता येतो. शिवाय चवीला एकदम भारी असते. छान कुरकुरीत लागते. अगदी मोजक्या सामग्रीत तयार करता येते. मूगडाळीचे वरण जर आवडीने खाता तर ही भाजी नक्कीच एकदम हीट ठरेल. एकदा करुन पाहा. लहान मुलेही आवडीने खातील. सोबत चपाती, भात काहीही घ्या. भाकरी असेल तर उत्तम. शिवाय ही भाजी नुसतीही छान लागते.
कृती१. मूगडाळ भिजवायची. अर्ध्या तासासाठी तरी भिजवा. हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या. ताजी कोथिंबीर घ्यायची आणि छान स्वच्छ धुवायची. बारीक चिरायची.
२. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात कडीपत्याची पाने घालायची. तसेच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. छान परतून घ्यायचे. त्यात भिजवलेली मूगडाळ घालायची आणि परतून घ्यायची. त्यात मीठ घालायचे. तसेच चमचाभर हळद घालायची. थोडे मीठ घालायचे आणि परतायचे.
३. मूगडाळ छान कुरकुरीत होते. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. लाल तिखट घालायचे आणि परतायचे. लिंबाचा रस घालायचा. सगळे पदार्थ छान एकजीव करायचे. परतून झाल्यावर गरमागरम खायचे.
Web Summary : Moong dal sabzi is a protein and fiber-rich dish that's quick to prepare. Simply soak the dal, sauté with spices, and enjoy a healthy, flavorful side with roti or rice. A must-try recipe!
Web Summary : मूंग दाल की सब्जी प्रोटीन और फाइबर से भरपूर है और इसे बनाना भी आसान है। बस दाल को भिगोकर मसालों के साथ भूनें और रोटी या चावल के साथ एक स्वस्थ और स्वादिष्ट साइड डिश का आनंद लें। अवश्य आजमाएँ!