Join us  

Raw Mango Chutney Recipe : जेवणात तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटात बनवा कैरीच्या ५ चटकदार चटण्या; उन्हाळा सुसह्य-जेवण मस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:46 PM

Raw Mango Chutney Recipe : दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी तुम्ही चटणी खाऊ शकता.

कैरीचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळा सुरू झाल्यानंतर जेवणाच्या ताटात आंबा किंवा कैरी हवीच... उन्हाळ्यात कच्ची कैरी खाल्ली नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. कच्ची कैरी तिखट मीठ लावून  खाण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही. कच्च्या कैरीप्रमाणेच कैरीची चटणीसुद्धा जेवणाची रंगत वाढवते. (Cooking Tips) दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी तुम्ही चटणी खाऊ शकता. जास्त खर्च न करता फक्त दोन ते तीन घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून ही चटणी तयार करता येऊ शकते. (How to make green mango chutney, make 5 types of Raw mango chutney at home)

साहित्य

१ कैरी

१ कांदा

१ चमचा लाल तिखट

१ चमचा हळद

१ चमचा गूळ

१ चमचा मीठ

१ पळी तेल 

१ चमचा मोहोरी, जीरं, हिंग

२, ३ कढीपत्त्याची पानं

कृती

सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून दोन भाग करून घ्या.

सर्वप्रथम कैरी आणि कांदा एकत्र किसून घ्या.

कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे त्यातील पाणी आधी काढून घ्या.

आता  कैरी, कांदा, लाल तिखट, गूळ आणि मीठ हे साहित्य एकजीव करा.

नंतर या मिश्रणावर तेल, मोहोरी, जीरं, हिंग, कढीपत्त्याची पानं घातलेली फोडणी टाका. तयार आहे कैरीची चटणी

रोजच्या जेवणाबरोबर तोंडी लावायला हा उत्तम पर्याय आहे. 

१)

२)

३)

४)

५)

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स