भेळ हा प्रकार असा आहे जो सगळ्यांनाच आवडतो. करायला सोपी आणि चवीला जबरदस्त. घरी केलेली भेळ जास्त छान लागते. कारण त्यात सगळेच पदार्थ भरभरुन घातले जातात. असाच एक प्रकार म्हणजे शेव कुरमुऱ्यांची कैरी भेळ. (Raw mango Bhel is a summer delight, see tasty recipe, easy snacks for kids )करायला अगदी सोपी आहे आणि चवी अगदी खास. पाहा कशी करायची.
साहित्य कुरमुरे, शेव, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, लाल तिखट, मीठ, कैरी, कोथिंबीर, लाल शेव , लिंबू
कृती१. कांदा सोलायचा आणि मस्त बारीक चिरुन घ्यायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा. त्याला सुटलेलं पाणी पिऊन टाका. त्यामुळे भेळ मऊ पडेल. टोमॅटो छान बारीक चिरला आणि सुटलेलं पाणी वेगळं केलं की टोमॅटो जास्त पाणी सोडत नाही.
२. हिरव्या मिरचीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात थोडं मीठ घालायचं आणि त्याची पेस्ट करुन घ्यायची. मिरची पूर्ण वाटली गेली पाहिजे. छान ताजी आणि आंबट कैरी घ्यायची, कैरी बारीक चिरुन घ्यायची. सालासकट चिरली तरी काही हरकत नाही.
३. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. निवडून घ्या. स्वच्छ धुवा आणि बारीक चिरुन घ्या. छान भरपूर कोथिंबीर घ्या. एका परातीत शेव आणि कुरमुरे घ्यायचे. लाल शेव घालायची आणि साधी पिवळी शेव पण घालायची. हाताने जरा चुरुन घ्यायचे. त्यात कुरमुरे घालायचे.
४. त्यात तयार केलेली मिरचीची पेस्ट घालायची. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. बारीक चिरलेली कैरी घालायची. कैरी भरपूर घ्या. तसेच त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. सगळं मिश्रण हाताने एकजीव करायचे आणि नंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचे. लाल तिखट घालायचे. तसेच हिरवीगार कोथिंबीर घालायची. सगळं मस्त मिक्स करुन घ्यायचं, त्यावर लिंबू पिळायचे. पुन्हा मिक्स करायचे. फक्त जेवढी खाणार तेवढ्यावरच लिंबू पिळा.
Web Summary : Enjoy a refreshing raw mango bhel this summer! This quick recipe uses simple ingredients like puffed rice, sev, raw mango, and spices. Mix everything well, add lemon, and enjoy this tangy treat. Perfect for kids and adults!
Web Summary : इस गर्मी में ताज़ा कच्चे आम की भेल का आनंद लें! इस त्वरित रेसिपी में मुरमुरा, सेव, कच्चा आम और मसालों जैसी सरल सामग्री का उपयोग किया गया है। सब कुछ अच्छी तरह मिलाएं, नींबू डालें और इस चटपटे व्यंजन का आनंद लें। बच्चों और वयस्कों के लिए बिल्कुल सही!