Join us

करा रवा-बेसनाचा सॉफ्ट स्पॅान्जी ढोकळा फक्त १० मिनिटांत, चवीला बेस्ट आणि पोटालाही चांगला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 14:51 IST

Rava Besan Dhokla Recipe : कैरी-पुदीन्याची चटणी, चिंचेची चटणी, सॉसबरोबर ढोकळा खाऊ शकता. (How to make khaman Dhokla)

नाश्त्याला  काहीतरी वेगळं, चवदार पदार्थ खावंस वाटलं तर आपण नेहमीच बाहेरचे पदार्थ खातो. सतत बाहेरचं खाऊन तब्येतीवर परिणाम होतोच. (Rava Besan Dhokla Recipe) सध्या वातावरणात सतत जाणवणारा बदल पाहता आपण जितकं घरातलं खाऊ तितकंच तब्येतीसाठी उत्तम ठरेल.  (How to make khaman dhokla at home)सॉफ्ट, स्पॉन्जी खमन ढोकळा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ तुम्ही घरच्याघरी अगदी मोजक्या साहित्यात बनवू शकता.  कैरी-पुदीन्याची चटणी, चिंचेची चटणी, सॉसबरोबर तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता. (How to make khaman Dhokla)

ढोकळा बनवण्याचं साहित्य (Rawa-besan dhokla recipe)

१ कप रवा

अर्धा कप बेसन पीठ

एक कप दही

अर्धा चमचा हळद पावडर

१ ते २ चिरलेल्या हिरव्या मिरची

१ टीस्पून किसलेले आले

चवीनुसार मीठ

२-३ टीस्पून तेल

आवश्यकतेनुसार पाणी

१ टीस्पून मोहरी

१ टीस्पून तीळ

८ ते १०  कढीपत्ता पानं

१-२ हिरव्या मिरच्या

१-२ टीस्पून चिरलेली ताजी कोथिंबीर

कृती

ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ कप रवा, १ कप बेसन एकत्र करून त्यात दही घाला.  दह्यासह रवा, बेसनाचं मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यात पाणी घाला.  हे मिश्रण एकत्र करून झाकून ठेवा. त्यात थोडं पाणी आणि हळद, मीठ, आल्याची पेस्ट, कढीपत्त्याची पानं, १ टिस्पून तेल घालून मिश्रण झाकून ठेवा.  त्यात एक चमचा मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. तेलानं ग्रीस केलेल्या एका मोकळ्या भांड्यात  ठेवून हे मिश्रण वाफेवर शिजवून घ्या.

१० ते १५ मिनिटांनी ढोकळ्याच्या मिश्रणात एक स्टिक किंवा सुरी घालून ढोकळा शिजला आहे की नाही ते पाहा. त्यानंतर ढोकळा व्यवस्थित बाहेर काढून थंड होऊ द्या. थंड झालेल्या ढोकळ्याचे चौकोनी काप करून. त्यावर फोडणीचं पाणी घाला किंवा कढईत फोडणी घालून परतवून घ्या. तयार आहे गरमागरम रवा-बेसनाचा ढोकळा. लहान मुलांना टिफिनमध्ये  देण्यासाठी, मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी रवा बेसनाचा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न