त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. तुम्ही घरच्याघरी झणझणीत तोंडाची चव वाढवणारी लसणाची चटणी करू शकता. लसणाची चटणी करायला एकदम सोपी असते. लसणाची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. राजस्थानी लसणाची चटणी ही चवीला खूपच झणझणीत आणि अप्रतिम लागते. चपाती, भाकरी किंवा भातासोबत ही चटणी खाऊ शकता. (Rajsthani Garlic Chutney Recipe)
राजस्थानी जेवणाची खरी लज्जत ही तिथल्या झणझणीत आणि चविष्ट चटणीमध्ये असते. त्यातही 'तळलेल्या लसणाची चटणी' हा प्रकार घराघरात लोकप्रिय आहे. ही चटणी करण्यासाठी सर्वप्रथम अर्धा कप सोललेला लसूण आणि चवीनुसार सुक्या लाल मिरच्या घ्याव्यात. जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर लवंगी मिरच्या वापरा किंवा रंगासाठी बेडगी मिरचीचा वापर करा.
लसणाची चटणी करण्याची सोपी रेसिपी
एका कढईत दोन ते तीन मोठे चमचे मोहरीचे तेल किंवा शेंगदाणा तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात जिरे आणि चिमूटभर हिंग टाकावा. त्यानंतर सोललेला अख्खा लसूण तेलात घालावा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून लसूण हलका सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. लसूण जास्त जळणार नाही याची काळजी घ्यावी, कारण करपट लसणामुळे चटणीची चव बिघडू शकते. लसूण तळून झाला की तो बाजूला काढून थंड होऊ द्यावा. आता मिक्सरच्या भांड्यात किंवा पाटा-वरवंट्यावर हा तळलेला लसूण, भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडे जिरे आणि थोडीशी चिंच एकत्र करून जाडसर वाटून घ्यावे. राजस्थानी पद्धतीत ही चटणी एकदम बारीक न करता थोडी जाडसर ठेवली जाते.
वाटलेली ही पेस्ट पुन्हा त्याच उरलेल्या गरम तेलात टाकावी. मंद आचेवर तेल सुटेपर्यंत ही चटणी साधारण ३-४ मिनिटे परतावी. तेलात परतल्यामुळे चटणीचा तिखटपणा संतुलित होतो आणि तिला एक विशिष्ट खमंग वास येतो. सर्वात शेवटी वरून थोडेसे कोमट पाणी किंवा ताक शिंपडल्यास चटणीला छान पोत येतो. तयार झालेली ही झणझणीत लसूण चटणी बाजरीची भाकरी, पोळी किंवा, भात पराठ्यासोबत अप्रतिम लागते. ही चटणी हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास ८-१० दिवस सहज टिकते. प्रवासात नेण्यासाठी किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Web Summary : Tired of the same old veggies? Try this simple Rajasthani garlic chutney recipe! It's spicy, flavorful, and perfect with roti, bhakri, or rice. Fry garlic, grind with chilies and spices, then temper in oil. Enjoy this taste enhancer for days.
Web Summary : पुरानी सब्जियों से ऊब गए हैं? इस सरल राजस्थानी लहसुन की चटनी रेसिपी को आजमाएं! यह मसालेदार, स्वादिष्ट और रोटी, भाकरी या चावल के साथ परिपूर्ण है। लहसुन भूनें, मिर्च और मसालों के साथ पीसें, फिर तेल में तड़का लगाएं। कई दिनों तक इस स्वाद बढ़ाने वाले का आनंद लें।