Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाव किडनी बीन्स पण किडनीसाठी मात्र ठरु शकतो घातक, पाहा राजमा खाण्याचे नियम-पचेलही नीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:21 IST

Rajma Side Effects for Kidney : राजम्याला किडनी बीन्स का म्हणतात? किंवा किडनी आणि राजम्याचा काय संबंध? हेच आज आपण पाहणार आहोत.

Rajma Side Effects for Kidney : किडनी बीन्स म्हणजेच राजमा खाणं अनेकांना आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीनं राजमा खाल्ला जातो. राजमा राइस, राजमा करी बहुतेक लोक नेहमीच खातात. आपणही जर नेहमीच राजमा खात असाल तर नक्कीच प्रश्न पडला असेल की, राजम्याला किडनी बीन्स का म्हणतात? किंवा किडनी आणि राजम्याचा काय संबंध? हेच आज आपण पाहणार आहोत, सोबतच हेही समजून घेणार आहोत की, खरंच राजमा किडनीसाठी फायदेशीर असतो का?

किडनी आणि राजमा कनेक्शन

आधी तर हे जाणून घेऊ की, किडनी आणि राजमा यात कनेक्शन काय आहे. तर राजम्याचा आकार किडनीसारखा असतो केवळ हाच राजमा आणि किडनीचा संबंध आहे. दुसरा संबंध असा की, राजमा किडनीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण यात प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहाड्रेट्स भरपूर असतात.

किडनीसाठी फायदेशीर राजमा

सरधोपटपणे सगळ्यांनाच असं वाटत असतं की, राजमा किडनीसाठी खूप फायदेशीर असतो. यात चूक काहीच नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, राजमा केवळ हेल्दी किडनी असलेल्यांसाठीच फायदेशीर ठरतो. कारण यातून किडनीसाठी आवश्यक प्रोटीन आणि फायबर मिळतं. पण किडनीसाठी फायदेशीर राजमा किडनीसाठी घातकही ठरू शकतो. म्हणजे ज्या लोकांना आधीच किडनीसंबंधी काही आजार असेल तर त्यांच्यासाठी राजमा खूप घातक ठरू शकतो. कारण यात पोटॅशिअम आणि ऑक्सालेट हे दोन तत्व भरपूर प्रमाणात असतात. जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात आणि किडनीचा आजार असल्याचा तो गंभीर करू शकतात.

राजम्यामध्ये प्रोटीन आणि प्यूरिन भरपूर असतं. प्रोटीन हेल्दी किडनीसाठी चांगलं असतं. पण जर किडनीमध्ये काही बिघाड असेल तर त्याने किडनीवर जास्त दबाव पडू शकतो. ज्या लोकांना किडनीसंबंधी एखादा जुना आजार असेल किंवा ज्यांच्या किडनी कमजोर असतील त्यांनी राजमा चुकूनही खाऊ नये. राजमा खाल्ल्यास यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढू शकतं आणि किडनीसंबंधी समस्या वाढू शकतात.

गॅस - अॅसिडिटीवाल्यांनी टाळावा

जर आपल्याला नेहमीच गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या राहत असेल, तर राजमा टाळलेलाच बरा. कारण रयात काही असे कॉम्प्लेक्स कार्बोहाड्रेट्स आणि फायबर असतात, जे पचवणं काही लोकांसाठी अवघड जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी राजमा खाल्ल्यास गॅस, पोट फुगणे, अपचन, पोटात जडपणा अशा समस्या होऊ शकतात.

काय काळजी घ्याल?

जर किडनीचा काही आजार असेल तर पोटॅशिअम आणि ऑक्सालेटमुळे राजमा कमी खावा. तसेच राजमा चांगला उकडणं गरजेचं आहे. जेणेकरून यातील विषारी तत्व नष्ट होतील आणि ऑक्सालेटचं प्रमाणही कमी होईल. जर किडनीसंबंधी काही समस्या असेल तर राजमा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajma: Kidney bean, but harmful for kidneys? Know the reason!

Web Summary : Rajma, though nutritious, can harm kidneys if pre-existing conditions exist. High potassium/oxalates worsen kidney issues. Gas-prone individuals should also avoid it. Cook thoroughly, consult a doctor.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य