Join us

शरीराला ऊर्जा देते नाचणीचे सूप, भर पावसात-कुडकुडणाऱ्या थंडीत करायला सोपे आणि पोटाला बरे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 16:58 IST

Ragi soup energizes the body, is easy to make, best food for rainy days and freezing cold, healthy food : आरोग्यासाठी चांगले असे नाचणीचे सूप नक्की करा.

सूप हा प्रकार पावसाळा आणि हिवाळा या दिवसांमध्ये घरोघरी केला जातो. कारण बाहेरच्या थंड वातावरणात असे गरमागरम काही प्यायला मिळाले की मजाच येते. (Ragi soup energizes the body, is easy to make, best food for rainy days and freezing cold, healthy food )तसेच सूप हा प्रकार पौष्टिक आहे. विविध प्रकारचे सूप करता येतात. मंचाव, टोमॅटो, कॉर्न. हे सारे पदार्थ पौष्टिक असतातच मात्र त्याहून पौष्टिक एक सूप करता येते. ते म्हणजे नाचणीचे सूप. करायला एकदम सोपे आहे आणि फारच पौष्टिक असते. महिलांसाठी खास पदार्थ आहे. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे.   

साहित्य आलं, लसूण, हिरवी मिरची, कडीपत्ता, तेल, जिरे, हिंग, कांदा, गाजर, टोमॅटो, पाणी, नाचणी, मीठ, काळीमिरी पूड, कोथिंबीर 

कृती १. एका भांड्यात थोडं पाणी घ्या. त्यात नाचणीचे पीठ भिजत ठेवायचे. पीठ पाण्यात घातल्यावर व्यवस्थित ढवळायचे आणि थोडावेळ झाकून ठेवायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. गाजर सोलून घ्यायचे. गारजाचे अगदी बारीक असे तुकडे करायचे. गाजर मस्त चिरुन घ्यायचे. कांदा सोलायचा आणि कांदाही बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा. 

२. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. तसेच लसण्याच्या पाकळ्या घ्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घ्या. त्याची पेस्ट तयार करा. जरा जाडसर पेस्ट करा अगदीच वाटून टाकू नका. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्या. धुवा आणि मग निवडून घ्या. कोथिंबीर बारीक चिरा. 

३. एका खोलगट पातेल्यात थोडे तेल घ्यायचे. अगदी चमचाभर किंवा त्याहूनही कमी तेल चालेल. म्हणजे सूप पौष्टिक होईल. त्याव जिरे घाला आणि जिरे छान फुलू  द्यायचे. त्यात थोडे हिंग घाला आणि मग तयार केलेली आले-लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि परतून घ्या. तसेच गाजर घाला, टोमॅटो घाल कोथिंबीर घाला छान परतून घ्या. त्यात काळीमिरी पूड घाला आणि मग थोडे मीठ घालून परतून घ्या. एक वाफ काढा. तयार केलेले नाचणीचे पाणी त्यात घाला. व्यवस्थित ढवळून घ्या. त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. पाणी घाला आणि एक वाफ काढा. गरमागरम सूप प्या.     

टॅग्स :अन्नआहार योजनापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.