नाचणी म्हणजेच रागी, ही कॅल्शियम, लोह आणि फायबरने समृद्ध असते. ती मुलांच्या हाडांना बळकटी देते आणि त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्वे पुरवते. रागीतील नैसर्गिक कॅल्शियम हे हाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, तर लोहामुळे रक्तनिर्मिती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (Ragi and moringa Soup, a boon for children in cold weather! must try recipe )तसेच शेवगा हा सुपरफूड म्हणून ओळखला जातो. शेवग्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व ए, सी, आणि के, तसेच लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व घटक मुलांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि वारंवार होणारे सर्दी-खोकल्यासारखे त्रास कमी करतात. त्यामुळे रागी मोरींगा सूप हे लहान मुलांसाठी औषधी ठरेल. पाहा कसे करायचे.
साहित्य
नाचणीचे पीठ, गाजर, मटार, पाणी, मीठ, लिंबू, कोथिंबीर, आलं, काळीमिरी, शेवग्याच्या शेंगा, तूप, दालचिनी, जिरे
कृती
१. आल्याचा लहान तुकडा, काळीमिरीचे काही दाणे, दालचिनीचे तुकडे आणि दोन चमचे जिरं कुटून घ्यायचे. एका खोलगट पातेलीत नाचणीचे पीठ घ्यायचे. एका कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा, मटारचे दाणे, गाजराचे तुकडे घालायचे. पाणी घालायचे आणि भाज्या उकडून घ्यायच्या.
२. सगळ्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या. पाणी खुप जास्त नाही घ्यायचे. वाटून घ्यायच्या. नंतर गाळून घ्यायच्या आणि चोथा काढून टाकायचा. त्यात पाणी घालून त्याचा अर्क पूर्णपणे काढून घ्यायचा. चांगली ताजी कोथिंबीरीची जुडी घ्यायची. निवडायची आणि कोथिंबीर बारीक चिरायची.
३. एका कढईत चमचाभर तूप घ्यायचे. त्यात वाटलेली आल्याची पेस्ट घालायची. छान परतायची, भाज्यांचा रस त्यात घालायचा. थोडे पाणी घालायचे. लिंबाचा रस घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. नाचणीचे मिश्रण ओतायचे. छान ढवळायचे. झाकून एक वाफ काढायची. नंतर जरा घट्ट होईपर्यंत उकळायचे. चवी पुरते मीठ घाला.
