अशा अनेक रेसिपी आहेत ज्या भारतात काही ठराविक राज्यांत केल्या जातात. त्या करायला सोप्या असतात आणि चवीला एकदम मस्त असतात. तळणीचे किंवा परतलेले कुरकुरीत पदार्थ घरोघरी केले जातात. थंडीच्या दिवसांत असे पदार्थ खायची मजाच काही वेगळी असते. असाच एक मस्त पदार्थ म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी केला जाणारा बचका . मटारचाही केला जातो आणि काळ्या चण्यांचाही. (Quickly make black gram bachaka - this crunchy and tasty dish is very special, traditional recipe)हा भजीचाच एक प्रकार आहे प्रकार आहे. फक्त तो तळण्यासाठी जास्त तेल वापरले जात नाही. कमी तेलात तळले जाते. तसेच फार कुरकुरीत असतो. पाहा कसा करायचा अगदी सोपी रेसिपी आहे.
साहित्य काळे चणे, बेसन, पाणी, मीठ, तांदूळाचे पीठ, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, जिरे पूड, हिंग, तेल
कृती१. एका कुकरमध्ये रात्रभर भिजवलेले काळे चणे घ्यायचे. त्यात पाणी घालायचे थोडी हळद घालायची. मीठ घालायचे आणि तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या. एका वाडग्यात बेसनाचे पीठ घ्यायचे. त्यात थोडे तांदूळाचे पीठ घालायचे. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आले किसून घ्यायचे. किसलेले आले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची बेसनात घालायची. त्यात पाणी घालायचे. तसेच लाल तिखटही घालायचे.
२. त्यात जिरे पूड घालायची. थोडे हिंग घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त ढवळून घ्यायचे. त्यात चवीपुरते मीठ घालायचे. ढवळून घ्यायचे. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. बेसनाच्या पिठत उकडलेले चणे घालायचे. ढवळायचे आणि मिश्रण छान तयार करायचे. जास्त घट्टही नको आणि अगदी पातळही नको. मध्यम असे मिश्रण तयार करायचे.
३ .पॅनमध्ये तेल गरम करत ठेवयाचे. तेल छान तापले की त्यात चमच्याच्या मदतीने लहान डोस्याप्रमाणे मिश्रणाचे गोल तयार करायचे. लहान असे इडलीच्या आकाराचे ठेवायचे. कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. दोन्ही बाजूनी खमंग आणि खुसखुशीत करुन घ्ययाचे. चवीला अगदी मस्त लागतात.
Web Summary : Bachka, a crispy snack from Bihar and Uttar Pradesh, is easy to make. Black chickpeas are cooked, mixed with spices and gram flour, then shallow fried until golden and crisp. A perfect tea-time treat, especially during winter.
Web Summary : बचका, बिहार और उत्तर प्रदेश का एक कुरकुरा नाश्ता, बनाने में आसान है। काले चने को पकाकर, मसालों और बेसन के साथ मिलाकर सुनहरा और कुरकुरा होने तक उथला तला जाता है। यह एक उत्तम चाय के समय का नाश्ता है, खासकर सर्दियों के दौरान।