Join us

झटपट रेसिपी - मूगडाळीची भाजी! पावसाळ्यात करा मस्त कोरडी परतलेली खंमग मूगडाळ-डाएटसाठीही बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 08:45 IST

Quick recipe - Moongdal recipe! Make delicious dry roasted moongdal during monsoon : मूगडाळीची भाजी कधी खाल्ली आहे का? फार छान लागते. करायला सोपी आहे. भाजी करायला लागणारी सामग्री नक्कीच घरात असेल.

मूगडाळीचे वरण अगदी आवडीने खात असाल. तसेच त्याची खिचडीही मस्त लागते. मात्र मूग डाळीची भाजी कधी खाल्यी आहे का? मस्त कुरकुरीत होते. (Quick recipe - Moongdal recipe! Make delicious dry roasted moongdal during monsoon )चवही जरा हटके आहे. पाहा कशी करायची. 

साहित्यमूग डाळ, हिरवी मिरची, तेल, जिरं, हिंग, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, मीठ, लाल तिखट, मीठ 

कृती१. मूगाची डाळ स्वच्छ धुवायची. धुतल्यावर पाण्यात भिजत ठेवायची. किमान तीन तास तरी भिजवायची. डाळ शिजवायची नाही किंवा वाफवायची नाही. त्यामुळे भिजवणे गरजेचे आहे. नाही तर डाळ कच्चीच राहील. दोन ते तीन तासांनंतर मूग डाळ जरा फुलली असेल तिच्या आकार बदलला असेल.    

२. कांदा सोलायचा मग मस्त बारीक चिरायचा. तसेच हिरव्या मिरचीचे लांब लांब तुकडे करायचे कोथिंबीरीची मस्त ताजी जुडी घ्यायची. कोथिंबीर निवडायची आणि मग बारीक चिरुन घ्यायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरुन घ्यायच्या. आलं बारीक किसून घ्यायचं. 

३. एका कढईत तेल गरम करत ठेवायचे. दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात जिरे घालायचे आणि जिरे छान फुलू द्यायचे. जिरं फुलल्यावर त्यात हिंग घालायचे. लसूण घालून मस्त परतायचा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. हिरवी मिरची जरा परतली की मग बारीक चिरलेला कांदा घालायचा. किसलेलं आलं घालायचं आणि कांदा गुलाबी होईपर्यत परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात कोथिंबीर घालायची.  सगळं छान परतून झाल्यावर त्यात मसाले घाला.

४. कांद्याच्या मिश्रणात लाल तिखट घालायचे. तसेच हळद घालायची. हळदीचा छान पिवळा रंग येतो. त्यात चवी पुरते मीठ घालायचे आणि मग मसाले जरा परतायचे. मसाले परतल्यावर त्यात भिजवलेली मूग डाळ घालायची. (Quick recipe - Moongdal recipe! Make delicious dry roasted moongdal during monsoon )डाळीचे पाणी काढून टाकायचे. थोडे पाणी ठेवा. ते लगेच आटेलच. भाजी ढवळायची. थोडा वेळ झाकून ठेवायची आणि एक वाफ काढायची. मग त्यात थोडे तेल घालायचे आणि कुरकुरीत होपर्यत परतायची.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती