सणवार असल्यावर आपल्याकडे गोडाधोडाचे पदार्थ फार मोठ्या प्रमाणवर तयार करण्याची पारंपरिक प्रथा आहे. या दिवसात घराघरांत गोडाचे पदार्थ मोठया हौसेने केले जातात, या गोडाच्या (Puranpoli Premix Recipe) पदार्थांमध्ये पुरणपोळीचा मान मोठा... गुढीपाडवा असो वा दिवाळी, पुरणपोळीशिवाय सण अपूर्णच वाटतो. पुरणपोळी ही महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थांपैकीच सर्वांचाच आवडता गोड पदार्थ... त्यामुळे अगदी आवडीने ही पुरणपोळी खाल्ली जाते. पण... पुरणपोळी करायची म्हटलं की मोठा घाट घालावा लागतो. डाळ शिजवण्यापासून ते पुरण तयार करेपर्यंत आणि मग पोळ्या लाटेपर्यंत खूप वेळ जातो(Instant Puranpoli Recipe).
सणासुदीच्या धावपळीत एवढा वेळ काढणे अनेकदा शक्य होत नाही. पण आता यावर आहे एक सोपा आणि स्मार्ट उपाय! एकदाच ६ महिने टिकणारे पुरणपोळी प्रिमिक्स तयार करून ठेवले, तर हवं तेव्हा काही मिनिटांत झटपट गरमागरम पुरणपोळ्या तयार करता येतात. जर तुम्हाला कमी वेळेत, अगदी आयत्या वेळी, अस्सल चवीची पुरणपोळी करायची असेल तर हे घरगुती प्रिमिक्स अतिशय फायदेशीर ठरते. तुम्ही एकदाच मेहनत करून सहा महिने टिकणारे 'पुरणपोळी प्रिमिक्स' तयार करून ठेवू शकता. या प्रिमिक्सचा वापर करून तुम्ही जेव्हा हवी तेव्हा फक्त काही मिनिटांत गरम पुरणपोळ्या झटपट तयार करु शकता. सणासुदीच्या ऐन धावपळीत जर पुरणपोळी तयार करण्याचा बेत असेल तर प्रिमिक्स वापरून पुरणपोळी कशी तयार करण्याची सोपी पद्धत पाहूयात...
साहित्य :-
१. हरभऱ्याची डाळ – २ कप
२. गुळ (किसलेला) – १ २/२ कप
३. वेलदोड्याची पूड – १/२ टेबलस्पून
४. जायफळ पूड – १/२ टेबलस्पून
५. साजूक तूप – २ टेबलस्पून
श्रीखंड केलं पण चवीला आंबट आणि पातळ होत? ७ टिप्स - विकतसारखे घट्ट, दाटसर श्रीखंड होईल छान...
बेसन नको, कपभर पोह्याचा करा पांढराशुभ्र ढोकळा! कधीही खा पोटभर, पचायला हलका आणि करायला सोपा...
कृती :-
१. सर्वात आधी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्या आणि साधारण ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ संपूर्णपणे भिजल्यावर ही डाळ पाणी न टाकता वाफेवर किंवा कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळ अगदी मऊ आणि शिजलेली हवी, पण पाण्यात भिजून पचपचीत झालेली नसावी.
२. शिजवलेली डाळ एका कढईत घाला आणि मंद आचेवर हलक्या हाताने परतवून घ्या. डाळीतील ओलसरपणा पूर्ण गेला पाहिजे, नाहीतर प्रिमिक्स लवकर खराब होईल. आता ही कोरडी डाळ पुरण यंत्रातून किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
उडपी हॉटेलात मिळते तसे करा इडली-डोसा पीठ, ७ स्टेप्स- इडली कापसासारखी आणि डोसा कुरकुरीत...
३. बारीक केलेल्या डाळीत किसलेला गूळ घाला आणि पुन्हा मंद आचेवर परतवून घ्या. ढवळताना सतत लक्ष ठेवा, कारण गूळ लवकर वितळतो आणि चिकटण्याची शक्यता असते. हळूहळू मिश्रण घट्ट होत जाईल. आता वेलदोडा आणि जायफळ पूड घालून मिसळा. शेवटी २ टेबलस्पून साजूक तूप घाला ज्यामुळे पुरणाला मस्त मऊसर आणि सुवासिक टेक्श्चर येईल. मिश्रण पूर्ण घट्ट आणि सुकटल्यासारखं झालं की गॅस बंद करा. हे पुरण पूर्ण थंड होऊ द्या आणि नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
पुरणपोळीचे प्रिमिक्स कसे स्टोअर करावे ?
१. हे प्रिमिक्स फ्रिजमध्ये ठेवलं तर ६ महिने ताजं राहतं.
२. डीप फ्रीजरमध्ये ठेवलं तर आणखी जास्त दिवस टिकतं.
३. पोळी करताना गरजेप्रमाणे प्रिमिक्स बाहेर काढा, थोडं गरम करा, गव्हाच्या पीठाच्या पोळ्यांमध्ये भरून गरमागरम पुरणपोळ्यांचा आनंद घ्या.
