Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलं, वेलची न घालता टपरीसारखा फक्कड होईल चहा; प्राजक्ता कोळीची 'नो मसाला चहा' रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:56 IST

Prajakta Koli Special Masala Free Chai : कमी साहित्यात साधा आणि मसाल्याच्या चहासारखाच चवदार चहा तुम्ही घरीच बनवू शकता.

चहाशिवाय दिवसाची सुरूवात नीट होत नाही असे बरेच लोक असतात. बऱ्याच जणांना चहा प्यायला खूप आवडतं. आलं आणि वेलची घातलेला चहा पिण्याचे शौकीन खूपजण असतात. त्यासाठी  चहा मसाल्याचा वापरही केला जातो. पण रोज रोज मसालेदार चहा प्यायल्यानं तब्येतीचं नुकसान होऊ शकतं. अनेकदा मसालेदार चहा प्यायल्यामुळे एसिडीटीचा त्रास होतो.  कमी साहित्यात साधा आणि मसाल्याच्या चहासारखाच चवदार चहा तुम्ही घरीच बनवू शकता. (Prajakta Koli  Special Masala Free Chai Recipe)

अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्राजक्ता कोळीनं चहा करण्याची एक सोपी रेसिपी शेअर केली आहे. प्राजक्तानं जी चहाची रेसिपी सांगितली आहे त्यात चहाच्या मसाल्यांचा वापर केलेला नाही. म्हणूनच या चहाला नो मसाला चहा असं म्हटलं आहे. यामुळे चहाची अस्सल चव जाणवते.

नो मसाला चहा कसा करतात?

हा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी उकळवून घ्या. पाण्याला उकळ आल्यानंतर   आच मंद करा आणि त्यात चहा पावडर घाला. नंतर झाकण ठेवून ३० सेकंद थांबा. ज्यामुळे चहा उत्तम बनतो. जर तुम्हाला चहा जास्तच घट्ट हवा असेल तर  थोडावेळ तसंच ठेवू शकता. नंतर असाच कोरा चहा एका कपात गाळून घ्या. गाळल्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार दूध आणि साखर घाला. या पद्धतीनं मसाले न घालताच चवदार चहा तयार होईल. प्राजक्ता सांगते की तिला मसालेवाला चहा जराही आवडत नाही. कारण मसाले चहाची अस्सल चव लपवतात. 

साध्या चहात फ्लॅव्हेनॉईड्स नावाचे एंटी ऑक्सिडेंट्स असतात हे घटक रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो.

 मसाले न घातलेला चहा पिण्याचे बरेच फायदे आहेत. चहा कितीही साधा असली तरी त्यात जास्त साखर घातल्यास त्याचे फायदे कमी होतात. शक्य असल्यास चहात साखर कमीत कमी घाला. सकाळी उठल्याबरोबर अगदी रिकाम्यापोटी चहा पिण्याऐवजी आधी पाणी प्या. जेणेकरून एसिडीटी होणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Koli's 'No Masala Chai' Recipe: Simple, Flavorful Tea.

Web Summary : Actress Prajakta Koli shares a simple tea recipe without spices. Boil water, add tea powder, steep, strain, then add milk and sugar. This 'No Masala Chai' retains tea's original flavor and offers health benefits, especially without excess sugar.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स