lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ‘ही’ नाजूक मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहा रेसिपीचा व्हिडिओ, नजाकत इतकी की..

‘ही’ नाजूक मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहा रेसिपीचा व्हिडिओ, नजाकत इतकी की..

How To Make Pootharekulu: बघा कशी नजाकतीने केली जाते आंध्रप्रदेश स्पेशल पुथारेकुलू मिठाई.. या रेसिपीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (viral recipe of making pootharekulu)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 04:05 PM2024-04-05T16:05:18+5:302024-04-05T16:06:17+5:30

How To Make Pootharekulu: बघा कशी नजाकतीने केली जाते आंध्रप्रदेश स्पेशल पुथारेकुलू मिठाई.. या रेसिपीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (viral recipe of making pootharekulu)

Pootharekulu sweet from Andhra Pradesh, How to make pootharekulu, viral recipe of making pootharekulu | ‘ही’ नाजूक मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहा रेसिपीचा व्हिडिओ, नजाकत इतकी की..

‘ही’ नाजूक मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहा रेसिपीचा व्हिडिओ, नजाकत इतकी की..

Highlightsसध्या पुथारेकुलू रेसिपीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही काही पदार्थ ज्या पद्धतीने केले जातात, ते करताना बघणं हे सुद्धा त्या पदार्थांच्या चवीइतकंच मोहक असतं.. त्यातलाच एक पदार्थ आहे आंध्र प्रदेशची खासियत असणारी पुथारेकुलू मिठाई. इतर सगळ्या गोड पदार्थांच्या रेसिपी एकीकडे आणि पुथारेकुलू या पदार्थाची रेसिपी एकीकडे असं म्हटलं तरी चालेल. कारण अतिशय नजाकतीने हा पदार्थ करावा लागतो. शिवाय तो अतिशय नाजूक आणि तलम असतो. त्यामुळे त्याला करताना खूप काळजीपुर्वक हाताळावं लागतं (How to make pootharekulu). सध्या पुथारेकुलू रेसिपीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (viral recipe of making pootharekulu)

 

आंध्रप्रदेशची स्पेशालिटी असणारी ही मिठाई दक्षिण भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. २०१८ साली आंध्रप्रदेशला या मिठाईसाठी जीआय नामांकन देखील मिळालेले आहे. तिथे लग्न- समारंभात किंवा शुभकार्यांमध्ये हा पदार्थ आवर्जून केला जातो. तांदूळाचं पाणी, सुकामेवा हे दोन या रेसिपीचे प्रमुख घटक आहेत.

तरुणपणी घोट्यापर्यंत लांब होते जया बच्चनचे केस, लांबसडक केसांसाठी करायच्या 'हा' घरगुती उपाय

शिवाय ती करण्याची पद्धतही अतिशय वेगळी आहे. पुथारेकुलू या शब्दाचा coated sheet असा इंग्रजी अर्थ होतो. त्या अर्थानुसारच तांदुळाच्या पिठाच्या अतिशय पातळ आणि तलम आवरणामध्ये त्या मिठाईतला सर्व मावा गुंडाळलेला असतो. 

 

पुथारेकुलू करण्याची पद्धत

तांदळाच्या पिठाचं अतिशय पातळ पाणी केलं जातं. त्या पाण्यात साखर आणि तूप टाकलं जातं. यानंतर खापराचा तुकडा भट्टीवर गरम केला जातो. त्यानंतर तो खोबरेल तेलात बुडवून पुन्हा तापवला जातो.

विकतसारखं मऊमऊ आईस्क्रिम घरी करण्यासाठी २ गोष्टी, आइस्क्रिममध्ये अजिबात होणार नाहीत बर्फाचे खडे

नंतर त्यावर तांदळाच्या पिठाचा अतिशय पातळ थर एखाद्या कापडाच्या मदतीने देतात. तो चांगला भाजून निघाला की आपोआप खापरापासून वेगळा होतो. या तांदळाच्या पिठाच्या आवरणावर मग तुपात घोळलेला सुकामेवा, गूळ आणि इतर पदार्थ टाकून त्याची घडी घालून पुथारेकुलू ही मिठाई तयार होते. ही रेसिपी बघणं खरोखरच खूप रंजक आहे. 

 

Web Title: Pootharekulu sweet from Andhra Pradesh, How to make pootharekulu, viral recipe of making pootharekulu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.