Join us

पारंपरिक हुरडा थालीपीठ आवडतं, ‘असं’ हुरडा धिरडंही करुन पाहा, पोटभर-पौष्टिक खाण्याचं सुख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2025 15:48 IST

Ponkh Chilla Recipe : How To Make Hurda Chilla At Home : Hurda Chilla Rcipe : How To Make Ponkh Chilla : थंडीत मस्त वातावरणातील गारठ्याचा आनंद घेत घरच्याघरीच झटपट करा हुरड्याच पौष्टिक धिरडं...

काही पदार्थ असे असतात की जे वर्षभर मिळत नाहीत, ते फक्त एखाद्या त्या सिझन पुरतेच विकत मिळतात. असाच एक पदार्थ खास करून हिवाळ्यात बाजारांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर (Ponkh Chilla Recipe) विकायला ठेवलेला असतो, तो म्हणजे हिरवागार हुरडा. हिवाळ्यात मित्र - मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत 'हुरडा पार्टीचे' (Hurda Chilla Rcipe)  बेत आखले जातात. थंडीच्या दिवसांत मस्त माळरानावर किंवा डोंगरमाथ्यावर जाऊन तिथल्या थंडीची मज्जा घेत मटक्यातील गरमागरम हुरडा खाल्ला जातो(How To Make Hurda Chilla At Home).

आपल्यापैकी बऱ्याचजणांनी अशा अनेक हुरडा पार्ट्या केल्या असतील. परंतु या हुरड्या पासून अनेक पदार्थ हिवाळ्यात घरोघरी केले जातात. हुरडा म्हणजे ज्वारीचेच कोवळे हिरवेगार, रसदार दाणे. या कोवळ्या हिरव्यागार हुरड्याच्या दाण्यांचा पौष्टिक व हेल्दी चिला चवीला तितकाच अप्रतिम आणि चविष्ट लागतो.  यंदाच्या हिवाळ्यात मस्त वातावरणातील गारठ्याचा आनंद घेत घरच्याघरीच झटपट करा हुरड्याचा पौष्टिक चिला. tarladalal या इंस्टाग्राम पेजवरुन हुरड्याचं धिरडं नेमकं कसं तयार करायचं याची साधीसोपी रेसिपी शेअर करण्यात आली आहे.  हुरड्याचा चिला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात(How To Make Ponkh Chilla).  

साहित्य :- 

१. हुरडा - १/२ कप २. बेसन - १/४ कप ३. तांदुळाचे पीठ - ३ टेबल्स्पून४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून६. हळद - १/२ टेबलस्पून ७. हिंग - १/४ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार९. पाणी - ३/४ कप१०. तेल - गरजेनुसार

हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...

आता भाजणीशिवाय करा खमंग-खुसखुशीत थालीपीठ! सकाळी नाश्ता भारी तर दिवस लै भारी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये हिरवागार हुरडा घेऊन त्यात बेसन, तांदुळाचे पीठ घालावे. २. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, हिंग घालावे. ३. सगळ्यात शेवटी या मिश्रणात चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून चमच्याने हे मिश्रण ढवळून एकजीव करून घ्यावे. 

हिवाळ्यात खा ‘हुरडा भजी’, खास गावरान बेत, पारंपरिक पौष्टिक रेसिपी-थंडीतला अस्सल गावरान बेत...

४. चिला तयार करण्यासाठी हुरड्याचे बॅटर तयार आहे. ५. आता एक पॅन घेऊन त्यावर तेल सोडून मग हे तयार बॅटर पॅनवर गोलाकार आकारात पसरवून घ्यावे. ६. बाजूच्या कडांजवळ तेल सोडून हा हुरड्याचा चिला दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजून घ्यावा. 

मस्त गरमागरम हिरव्यागार हुरड्याचा चिला खाण्यासाठी तयार आहे. हा चिला दही, लोणचं, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहारकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स