पोहा बाईट्स हा एक फार चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. स्नॅक्स म्हणून नक्की करा. करायला अगदी सोपा आहे. तसेच पोह्यांचा असा वापर तुम्ही फार कधी करत नसाल. पोह्यांचे असे विविध पदार्थही करता येतात. (Poha bites recipe: Make a great breakfast of poha, even kids will love poha bites - a great holiday snack)जे पौष्टिक असतात. लहान मुलांसाठी अगदी मस्त रेसिपी आहे. आवडत्या भाज्या वापरुन करुन पाहा. सगळ्यांना नक्कीच आवडेल.
साहित्य पोहे, रवा, दही, पाणी, गाजर, कोथिंबीर, पाणी, मीठ , लाल तिखट, तेल, मोहरी, कडीपत्ता
कृती१. वाटीभर पोहे धुवायचे. पोहे धुतल्यावर त्यात अर्धी वाटी रवा घालायचा. तसेच चार ते पाच चमचे दही घालायचे आणि तिन्ही पदार्थ छान मिक्स करायचे. एकजीव करायचे. दही जास्त वापरले तरी चालेल, रवा आणि पोहे व्यवस्थित त्यात भिजले पाहिजेत. त्यावर झाकण ठेवायचे आणि पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे.
२. गाजर सोलायचे आणि बारीक चिरायचे. तसेच कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्या. निवडा आणि मग बारीक चिरुन घ्या. पंधरा मिनिटांनी मिश्रण एकदा ढवळून घ्या. त्यात चिरलेले गाजर घाला. तसेच कोथिंबीर घाला आणि चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर लाल तिखट घालायचे. मस्त सैलसर पीठ मळून घ्यायचे.
३. त्याचे लहान गोळे तयार करायचे. एका इडलीपात्रात व्फवा किंवा कढईत पाणी घ्यायचे आणि त्यावर चाळणीत हे बाईट्स वाफवून घ्या. कुकरमध्ये पाणी ठेऊन कुकरचाही वापर करु शकता. दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचे. छान वाफवायचे. मग काढून घ्यायचे.
४. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यावर मोहरी घालून परतायची. मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा. नंतर तयार बाईट्स घालायचे आणि छान खमंग परतायचे. त्यावर थोडे लाल तिखट घालायचे. थोडे कुरकुरीत करायचे. गरमागरम खायला घ्यायचे. सोबत चटणी, सॉस जे आवडते ते घ्या. हिरवी चटणी असेल तर नक्कीच मजा येईल.
Web Summary : Poha bites are a delicious and nutritious snack, easy to make with poha, semolina, yogurt, and vegetables. Steam and then temper with mustard seeds and curry leaves for a crispy, flavorful treat. Perfect with chutney or sauce.
Web Summary : पोहा बाइट्स एक स्वादिष्ट और पौष्टिक नाश्ता है, जिसे पोहा, सूजी, दही और सब्जियों के साथ बनाना आसान है। भाप लें और फिर सरसों के बीज और करी पत्ते के साथ कुरकुरा और स्वादिष्ट बनाने के लिए तड़का लगाएं। चटनी या सॉस के साथ परोसें।