गणरायांचे विसर्जन पार पडल्यानंतर लगेचच पितृपक्षाला (Pitru Paksh 2025) सुरूवात होते. पितृपक्षात प्रत्येक घरांमध्ये आपापल्या प्रथेनुसार पदार्थ बनवले जातात. या दिवसांत तांदळाची खीरसुद्धा करतात. तांदळाची खीर अनेकांना खायला आवडते. तांदळाची खीर तुम्ही अनेक प्रकारे बनवू शकता. नैवेद्यासाठी केली जाणारी ही खीर कधी पातळ होते, कधी खूपच गोड होते अशी अनेकांची तक्रार असते. (How To Make Rice Kheer For Pitru Paksh)
परफेक्ट तांदळाची खीर कशी करायची त्याची साधी, सोपी रेसिपी पाहूया. ही खीर चवीला चांगली असते त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीनंही चांगली असते. यात दूध, भात, ड्रायफ्रुट्स असे पौष्टीक घटक असतात. खीर परफेक्ट होण्यासाठी दूधाचं प्रमाण योग्य असावं लागतं. खीर परफेक्ट बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Kheer For Pitru Paksh)
तांदूळाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य
१) जुना तांदूळ: अर्धा कप
२) दूध: १ लीटर
३) साखर: पाऊण कप (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
४) वेलची पूड: अर्धा चमचा
५) सुकामेवा (बदाम, काजू, मनुका): ४ ते ५
६) तूप: गरजेनुसार
तांदूळाची खीर करण्याची सोपी पद्धत
सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून १५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे तांदूळ लवकर शिजतो.मग एका जाड पातेल्यात तूप गरम करून त्यात सुकामेवा मंद आचेवर हलकासा भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.
उपमा बिघडतो-गचका होतो,बेचव लागतो? ७ टिप्स,नाश्त्याला मऊसूत उपमा करा घरीच
नंतर त्याच पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दुधाला उकळी आल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ घाला. तांदूळ घातल्यानंतर दूध सतत ढवळत राहा, जेणेकरून तांदूळ पातेल्याला चिकटणार नाही.
मंद आचेवर तांदूळ पूर्णपणे शिजून मऊ होईपर्यंत शिजवा. याला साधारणपणे १५-२० मिनिटे लागतील. तांदूळ शिजल्यानंतर तो चमच्याने थोडासा दाबून घ्या, यामुळे खीर दाटसर होते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात चारोळीसुद्धा घालू शकता.
१ वाटी मूग डाळीच्या करा प्रोटीनयुक्त मऊसूत इडल्या; १० मिनिटांत होतील पौष्टीक इडल्या, सोपी रेसिपी
तांदूळ शिजल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा.शेवटच्या पायरीत खीर थोडी घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. वरून भाजलेला सुकामेवा घालून खीर सजवा. ही खीर गरमागरम किंवा थंड करूनही खाऊ शकता. पुरीसोबत किंवा चपातीसोबत खायला ही खीर उत्तम लागेल.