Join us

Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:24 IST

Pitru Paksha 2025: यंदा ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, या कालावधीत पितरांना नैवेद्य करताना त्यात आवर्जून केली जाते आमसुल चटणी, जाणून घ्या महत्त्व आणि रेसिपी.

खीर, वडे, आमसुलाची चटणी हे पितृपक्षातील(Pitru paksha 2025) नैवेद्याचे मुख्य प्रकार आहेत. बाकी वरण, भात, पुऱ्या, भाज्या, भजी, पापड, कुरडई इत्यादी पदार्थ गृहिणी त्यांच्या सोयीने करतात. मात्र आमसुलाच्या चटणीशिवाय या नैवेद्याला पूर्णत्त्व येतच नाही. जांभळ्या रंगाची ही चविष्ट चटणी एरवीच्या जेवणात का केली जात नसावी, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. 

Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

आयुर्वेदानुसार कोकम पित्तनाशक आहे. अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. त्याचा वापर करतात. कोकमात अनेक पोषक घटक असतात. ज्याचा तुमच्या शरीरावर चांगला फायदा होतो. कोकमातील व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर्स आणि पाचक घटकांमुळे आहारात त्याचा वापर करणे फारच गरजेचे ठरते. कोकमाचा आहारात समावेश केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदय विकारापासून रक्षण होते, नैराश्य कमी होते, मधुमेह नियंत्रणात राहतो. तसेच त्वचेचे विकार दूर होतात. म्हणून कोकम सरबत, कोकम सोलकढी, सार, आमटीत वापर केला जातो. असे असूनही कोकम चटणी पूर्वापार पितृपक्षातील नैवेद्याशी जोडली गेल्याने ती रोजच्या जेवणात किंवा इतर सणासुदीच्या काळात निषिद्ध ठरवली गेली असावी. कारण कोकम चटणी पाहताच पितृपक्षाचा नैवेद्य आठवणार आणि सणांचा उत्साह लोप पावणार, म्हणून ती एरवी टाळली जात असावी. तसे असले तरी सध्या पितृपक्ष सुरू असल्याने ती कशी करायची ते शिकून घ्या. 

Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!

साहित्य:

५-६ आमसुलंआमसुल गोळ्याच्या दुप्पट गूळ३-४ मिरच्याजिरंमीठ

कृती:१) आमसुलं १५-२० मिनीटे पाव वाटी गरम पाण्यात भिजत ठेवावीत. किंवा आमसुलाचे सार करून झाल्यावर उरलेली आमसुलं वापरावीत.२) भिजवलेली आमसुलं, गूळ, मिरच्या, जिरं, मिठ एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.

टॅग्स :पितृपक्षअन्नहेल्थ टिप्सपाककृती