Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट - अजिबात विसरु नका प्रमाण...

प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट - अजिबात विसरु नका प्रमाण...

Perfect Idli Dosa Batter Recipe : how to make idli dosa batter at home : मऊ कापसासारख्या पांढऱ्याशुभ्र इडल्या आणि कुरकुरीत डोसा होण्यासाठी परफेक्ट बॅटर करण्याची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2026 17:04 IST2026-02-27T15:25:49+5:302026-02-28T17:04:12+5:30

Perfect Idli Dosa Batter Recipe : how to make idli dosa batter at home : मऊ कापसासारख्या पांढऱ्याशुभ्र इडल्या आणि कुरकुरीत डोसा होण्यासाठी परफेक्ट बॅटर करण्याची रेसिपी...

Perfect Idli Dosa Batter Recipe how to make idli dosa batter at home homemade idli dosa batter tips | प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट - अजिबात विसरु नका प्रमाण...

प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट - अजिबात विसरु नका प्रमाण...

दाक्षिणात्य पदार्थ, विशेषतः इडली आणि डोसा, हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. पण अनेकदा घरी बनवलेली इडली हवी तशी मऊ होत नाही किंवा डोसा हवा तसा कुरकुरीत होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे डाळ आणि तांदळाचे चुकलेले प्रमाण...मऊ, स्पंजी इडली आणि खुसखुशीत डोसा हा प्रत्येकाच्या आवडीचा दक्षिण भारतीय नाश्ता असला तरी घरच्याघरीच परफेक्ट बॅटर तयार करणं अनेकांसाठी मोठं कठीण काम... कधी इडल्या घट्ट होतात, तर कधी डोसा नीट पसरत नाही... पण तेच जर बॅटर अगदी परफेक्ट असेल तर इडल्या मऊ - लुसलुशीत आणि डोसा कुरकुरीत होतो...(Perfect Idli Dosa Batter Recipe).

डाळ - तांदुळाचे योग्य प्रमाण, पाण्यांत भिजवण्याची वेळ आणि बॅटर फर्मेंट होण्याची योग्य पद्धत माहित असेल तर अगदी हॉटेलसारख्या फ्लफी इडल्या आणि कुरकुरीत डोसे घरच्या घरी सहज तयार करता येतात. घरी परफेक्ट पिठ (Batter) तयार करणे ही एक कला आहे, जी योग्य प्रमाणात डाळ-तांदूळ भिजवणे आणि ते योग्य रीतीने आंबवणे (Fermentation) यावर अवलंबून असते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमची इडली कापसासारखी पांढरीशुभ्र आणि (how to make idli dosa batter at home) मऊ व्हावी, तसेच डोसा कुरकुरीत व्हावा यासाठी बॅटर तयार करण्याची योग्य पद्धत पाहूयात... 

साहित्य :- 

१. इडली करण्यासाठीचा तांदूळ - ३ कप (किंवा इतर कोणताही जुना तांदूळ)
२. पांढरी उडीद डाळ - १ कप 
३. चणा डाळ - १ टेबलस्पून 
४. तूर डाळ - १ टेबलस्पून 
५. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
६. पाणी - गरजेनुसार
७. पोहे - १/२ कप 
८. साखर - १ टेबलस्पून

अश्विनी काळसेकरांच्या घरी केलं जातं शेवग्याच्या शेंगांचं पारंपरिक लोणचं! जेवणाची चव वाढवणारी सुपरहिट रेसिपी... 


कुरमुऱ्याची भेळ नाही करा इन्स्टंट उत्तप्पा! ना पीठ आंबवण्याची कटकट, ना डाळ - तांदूळ वाटण्याची झंझट - चविष्ट रेसिपी...

कृती :- 

१. सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये इडली करण्यासाठीचा तांदूळ किंवा आपण इतर कोणताही जुना तांदूळ देखील वापरू शकता. त्यानंतर त्यात पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, तूर डाळ, मेथी दाणे घालावेत. 
२. आता या सगळ्या मिश्रणात पाणी घालून किमान ३ ते ४ वेळा पाणी बदलून सगळे जिन्नस व्यवस्थित धुवून घ्यावेत. पाण्याचा पांढरा रंग संपूर्णपणे निघून जाऊन पाणी जोपर्यंत एकदम स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत हे सगळे पदार्थ एकत्रित धुवून घ्यावेत. 
३. मग या सगळ्या मिश्रणात पुरेसं पाणी घालून भांडं झाकून ठेवून ६ ते ८ तास हे मिश्रण भिजण्यासाठी ठेवून द्यावे. 

४. ६ ते ८ तासानंतर जेव्हा सगळे मिश्रण पूर्णपणे भिजलेलं असेल तेव्हा, एका बाऊलमध्ये पोहे घेऊन ते १० ते १५ मिनिटे भिजवून घ्यावेत. 
५. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात भिजवून घेतलेले डाळ - तांदूळ आणि भिजवलेले पोहे घालावेत. त्यानंतर यात गरजेनुसार डाळ - तांदूळ भिजवलेलं पाणी घालून मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.   
६. मिश्रण मिक्सरमध्ये वाटून झाल्यावर एका भांड्यात काढावे. मिश्रण चमच्याने खाली पडताना ते एखाद्या रिबीनसारखेच पडले पाहिजे म्हणजे असेच बॅटर अगदी परफेक्ट असते. 
७. मिश्रण वाटून घेतल्यावर सगळ्यात शेवटी त्यात चमचाभर साखर घालून मिश्रण २ ते ३ सेकंद हाताने फेटून घ्यावे. मग झाकण लावून एका उबदार ठिकाणी ठेवून ८ ते ९ तासांसाठी फर्मेंटेशनसाठी ठेवावं. 
८. गरजेनुसार हवं तेवढं पीठ घेऊन त्यात चवीनुसार आयत्यावेळी मीठ घालून डोसे तयार करुन घ्यावेत. उरलेलं बॅटर आपण फ्रिजमध्ये ठेवून पुढील ६ ते ७ दिवसांसाठी स्टोअर करुन ठेवू शकता.

अशाप्रकारे आपण डाळ - तांदुळाचे योग्य प्रमाण घेऊन इडली - डोशासाठीचे अगदी परफेक्ट मऊसूत, लुसलुशीत बॅटर तयार करू शकतो.

Web Title : परफेक्ट इडली डोसा: फूला हुआ बनाने के लिए बैटर का अनुपात जानें।

Web Summary : चावल और दाल के बैटर को सही करके नरम इडली और कुरकुरे डोसे बनाएं। सही अनुपात, भिगोने का समय और फर्मेंटेशन महत्वपूर्ण हैं। इस रेसिपी में चावल, उड़द दाल, चना दाल, तूर दाल, मेथी के बीज, पोहा और चीनी शामिल हैं।

Web Title : Perfect Idli Dosa: Master the batter ratio for fluffy results.

Web Summary : Achieve soft idlis and crispy dosas by perfecting the rice and lentil batter. The right ratio, soaking time, and fermentation are key. This recipe includes rice, urad dal, chana dal, toor dal, fenugreek seeds, poha, and sugar.