Join us

Shengdana Chutney Recipe : फक्त ५ मिनिटात करा शेंगदाण्याची झणझणीत, लज्जतदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल गोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:24 IST

Shengdana Chutney Recipe : भाजलेल्या शेंगदाण्यांची चटणी अगदी कमीत कमी वेळात तयार होईल आणि जास्त मेहनतही करावी लागणार नाही.

जेवायला बसल्यानंतर भात, भाजी, चपाती व्यक्तीरिक्त काहीतरी चटपटीत, तिखट तोंडी लावणीसाठी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. लोणचं रोज रोज  खायला सर्वांनाच आवडतं असं नाही.  (Peanut Chutney Recipe) भाजलेल्या शेंगदाण्यांची चटणी अगदी कमीत कमी वेळात तयार होईल आणि जास्त मेहनतही करावी लागणार नाही. जर भाजी बनवली नसेल तर चपातीबरोबर, खिचडीबरोबर किंवा डाळ भातसह ही चटणी तुम्ही खाऊ शकता. (5 Minute Peanut Chutney Recipe)

शेंगदाणा चटणीची ही पद्धत सुद्धा ट्राय करून पाहा

साहित्य

१ वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे

१ चमचा जीरं

२ चमचे लाल तिखट

५ ते ६ लसूण

मीठ चवीनुसार

१ ते २ चमचे तेल

कृती

१) कढईत तेल  गरम करून जीरं टाकून भाजून घ्या

२) त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे घाणा ते मध्यम आचेवर भाजून घ्या

३) हलकं भाजून झाल्यावर  या मिश्रणात तिखट, मीठ घालून मिक्स करा.

४) हे मिश्रण खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये कुटून घ्या.

५) यात गरजेनुसार तेल घाला. तयार आहे शेंगदाण्याची चटणी 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स