Join us

कुकरमध्ये १० मिनिटांत करा हॉटेलसारखी टेस्टी पाव भाजी; सोपी रेसिपी, झटपट बनेल पाव भाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 13:32 IST

Pav Bhaji In Cooker : पावभाजी करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

पावभाजी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पावभाजी हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो (Pav Bhaji In Cooker). पावभाजी खायला जितकी सोपी आहे करायलाही तितकीच सोपी आहे. पावभाजी करायला तासनातास न घालवता सोप्या पद्धतीनं तुम्ही पावभाजी बनवू शकता. पावभाजी  कुकरमध्ये करणं एकदम सोपं आहे. पावभाजी करण्याची सोपी रेसिपी पाहूया (Pav Bhaji Recipe). पावभाजी करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. कुकरमध्ये झटपट पावभाजी बनून तयार होते.तुमच्या आवडीच्या भाज्या कमी जास्त प्रमाणात तु्म्ही भाजीमध्ये घालू शकता. (How To Make Pav Bhaji In Cooker) 

कुकरमध्ये पावभाजी करण्यासाठी लागणारं साहित्य

भाज्या

बटाटे (२ मध्यम) फुलकोबी (१ वाटी चिरलेला) हिरवे वाटाणे (१/२ वाटी) गाजर (१/२ वाटी चिरलेला)ढोबळी मिरची (१/२ वाटी चिरलेली).

मसाले

 पावभाजी मसाला (२ ते ३ चमचे) तिखट (१ ते २ चमचे)हळद (१/२ चमचा).

कांदे (१ मोठा, बारीक चिरलेला)टोमॅटो (२ मोठे, बारीक चिरलेले)आले-लसूण पेस्ट (१ चमचा)बटर/तेल (आवश्यकतेनुसार)मीठ (चवीनुसार)कोथिंबीर (सजावटीसाठी).

पावभाजी करण्याची सोपी रेसिपी पाहूया

कुकरमध्ये १ मोठा चमचा बटर आणि १ चमचा तेल गरम करा.चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. नंतर आले-लसूण पेस्ट आणि ढोबळी मिरची घालून १ मिनिट परतून घ्या. चिरलेले टोमॅटो आणि थोडे मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. आता हळद, तिखट आणि पावभाजी मसाला घाला. मसाल्यातून तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परता.

या मसाल्यात बटाटे, फुलकोबी, वाटाणे आणि गाजर या चिरलेल्या भाज्या घाला. भाज्यांमध्ये अंदाजे १ ते १.५ ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या मध्यम आचेवर घ्या. कुकरची हवा आपोआप गेल्यावर झाकण उघडा. भाजी स्मॅशरने व्यवस्थित मॅश करा. भाजीची जाडी तुम्हाला हवी तशी ठेवण्यासाठी गरम पाणी घाला.

भाजीला मंद आचेवर ५ मिनिटे उकळी येऊ द्या. शेवटी भरपूर बटर आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. तव्यावर बटर गरम करा. त्यावर थोडा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घाला. पाव मध्यभागी कापून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. गरमागरम भाजी, बटरमध्ये भाजलेले पाव, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू सोबत सर्व्ह करा.

English
हिंदी सारांश
Web Title : 10-Minute Cooker Pav Bhaji: Easy, Hotel-Style Recipe for Quick Pavbhaji

Web Summary : Make hotel-style Pav Bhaji in just 10 minutes using a cooker! This simple recipe involves cooking vegetables with spices, mashing, and serving with buttered pav. Enjoy quick and tasty Pav Bhaji at home.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स