मशरुम फक्त पौष्टिक नाही तर चविष्टही लागतात. मशरुम मसाला वगैरे तर तुम्ही खाल्ला असेलच. आता एकदा परिनिती चोप्राची ही रेसिपी करुन पाहा. मशरुम टोस्ट हा पदार्थ सध्या व्हायरल झाला आहे. कर्ली टेल्ससोबतच्या पॉडकास्टमध्ये राघव चढा यांनी परिनितीची खास रेसिपी सांगितली. (Parineeti Chopra reveals her favorite dish that can be made in 5 minutes - Mushroom Toast, Easy recipe - Nutritious food)मशरुम तसे फार आवडीने खाल्ले जात नाहीत. ते सगळ्यांना बेचव वाटतात, मात्र एकदा या पद्धतीने करुन पाहा कारण हा पदार्थ करायला अगदीच सोपा आहे आणि नाश्त्यासाठी नक्की करता येईल. पाहा कसा करायचा. मशरुम न आवडणाऱ्यांनाही त्याची चव आवडायला लागेल.
साहित्य
मशरुम, मैदा, बटर, दूध, काळीमिरी पूड, मीठ, चिलीफ्लेक्स, चीज, ब्रेड
कृती
१. मशरुम स्वच्छ धुवायचे. सालं काढून घ्यायची त्याचे तुकडे करायचे. जास्त लहान तुकडे करु नका. जरा मोठे तुकडेच करायचे. पॅनमध्ये थोडं बटर घ्यायचे. त्यावर मशरुम परतून घ्यायचे. मशरुम जरा कुरकुरीत परतायचे. मग काढून घ्यायचे.
२. एका वाटीत थोडा मैदा घ्यायचा. त्यात थोडे दूध घालायचे आणि पेस्ट तयार करायची. त्याच पॅनमध्ये थोडं बटर घ्या. त्यात काळीमिरी पूड घालायचे. तसेच चिलीफ्लेक्स घालायचे. परतायचे आणि मग त्यात मशरुम घालायचे आणि परतून घ्यायचे. मैद्याची पेस्ट त्यात ओतायची. व्यवस्थित शिजवायची. मग त्यात चीज घालायचे आणि मशरुमही घालायचे.
३. तव्यावर ब्रेड परतून घ्यायचा. दोन्ही बाजूनी छान परतायचा. नंतर तयार केलेला व्हाइट सॉस मशरुम त्यावर लावायचे. गरमागरम खायचे.
