बऱ्याचदा असं होतं भात खूप जास्त उरतो. नंतर त्या भाताला फोडणी देऊन आपण खातो. पण नेहमी त्याच त्या चवीचा फोडणीचा भात खाण्याचाही कंटाळा येतो. म्हणूनच आता त्या उरलेल्या भाताला थोडी वेगळ्या पद्धतीने फोडणी घाला आणि त्याचा खमंग पनीर पुलाव करा. रेसिपी अतिशय सोपी असून ती खूप जास्त चवदार होते (Paneer Pulav Recipe). खूप शिळा भात मात्र घेऊ नका. सकाळी केलेला भात रात्री किंवा रात्रीचा भात सकाळी अशाच पद्धतीने खावा..(how to make paneer pulav from leftover rice?)
पनीर पुलाव करण्याची रेसिपी
साहित्य
उरलेला भात ४ वाट्या
१ वाटी पनीरचे काप
सिमला मिरची, कांदा, टोमॅटो असं प्रत्येकी एकेक मध्यम आकाराचं घ्यावं.
वापरलेल्या पणत्यांवरचे तेलकट, काळपट डाग कसे काढायचे? १ सोपी ट्रिक, पणत्या नव्यासारख्या स्वच्छ होतील
आलं, लसूण पेस्ट १ चमचा
३ ते ४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
अर्धा कप दही
दालचिनी पूड, मिरे पूड, गरम मसाला, धने आणि जिरे पूड प्रत्येकी एकेक चमचा
चवीनुसार मीठ
रेसिपी
गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढईमध्ये तेल घाला. तेल तापल्यानंतर आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतून घ्या.
मराठवाडा स्पेशल रेसिपी: तोंडाला चव आणणारा झणझणीत लसणाचा भुरका, महिनाभर टिकणारा पदार्थ
भाज्या परतून झाल्यानंतर त्यात दही आणि इतर मसाले घाला. त्यानंतर त्यात पनीरचे काप घाला आणि एखाद्या मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवून द्या.
यानंतर त्यामध्ये उरलेला भात आणि चवीनुसार मीठ घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. चमचमीत चवीचा पनीर पुलाव तयार...
