Lokmat Sakhi >Food > पंचायतची मंजूदेवी इलेक्शन हरली पण ‘लौकी’ जिंकली! पाहा ‘लौकी जाबर’ पदार्थ, दुधीभोपळाही आवडू लागेल..

पंचायतची मंजूदेवी इलेक्शन हरली पण ‘लौकी’ जिंकली! पाहा ‘लौकी जाबर’ पदार्थ, दुधीभोपळाही आवडू लागेल..

Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish : एकदा हा सोपा आणि साधा पदार्थ करुन पाहा. पुन्हा नक्कीच कराल. दुधीभोपळा आवडत नसेल तर आवडायला लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 17:46 IST2025-07-02T17:45:36+5:302025-07-02T17:46:32+5:30

Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish : एकदा हा सोपा आणि साधा पदार्थ करुन पाहा. पुन्हा नक्कीच कराल. दुधीभोपळा आवडत नसेल तर आवडायला लागेल.

Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish | पंचायतची मंजूदेवी इलेक्शन हरली पण ‘लौकी’ जिंकली! पाहा ‘लौकी जाबर’ पदार्थ, दुधीभोपळाही आवडू लागेल..

पंचायतची मंजूदेवी इलेक्शन हरली पण ‘लौकी’ जिंकली! पाहा ‘लौकी जाबर’ पदार्थ, दुधीभोपळाही आवडू लागेल..

पंचायत सिरीजनंतर नीना गुप्तांची मंजू देवी ही भूमिका फार  गाजली. संपूर्ण सिरीयलमध्ये मंजू देवी घरी येणाऱ्या सगळ्यांना दुधीभोपळा खाऊ घालताना दिसल्या. पण फक्त मंजूलाच नाही तर नीनाला देखील दुधीभोपळा आवडतो.(Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish) त्यांनी सांगितलेली दुधीभोपळा राईस रेसिपी फारच लोकप्रिय ठरली. अत्यंत साधी आणि चविष्ट अशी ही रेसिपी नक्की करुन पाहा. ही रेसिपी बिहारमध्ये केली जाते. लौकी जाबार असे या पदार्थाचे नाव आहे. एक साधा तडका देऊन ही रेसिपी करता येते. पाहा कशी करायची. दुधीभोपळा पौष्टिक असतो मात्र त्याची चव लोकांना आवडत नाही. एकदा ही रेसिपी खाल्यावर मात्र चव आवडायला लागेल.   

साहित्य
दुधीभोपळा, तांदूळ, पाणी, दूध, तूप, मोहरी, जिरे, कडीपत्ता, लाल मिरची, मीठ, मेथी दाणे  

कृती
१. दुधीभोपळा सोलून घ्यायचा आणि सोलून झाल्यावर छान किसून घ्यायचा. तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि मग थोडावेळ पाण्यात ठेवायचे. 

२. एका खोलगट पातेल्यात किंवा कुकरमध्ये कुसलेला दुधीभोपळा परतायचा. व्यवस्थित दोन मिनिटांसाठी परतायचा. मग त्यात तांदूळ घालायचे आणि ढवळून घ्यायचे. पाणी घालायचे आणि भात आणि दुधीभोपळा शिजेपर्यंत वाफवायचे. भात छान शिजल्यावर त्यात दूध घालायचे. दूध भातात छान जिरले की मग त्यात मीठ घालायचे भात मस्त मऊ आणि ओलसरच करायचा. एकदम पातळ नको. भात झाल्यावर भात नीट शिजलाय की नाही ते तपासायचे. भात छान शिजल्यावर गॅस बंद करायचा. 

३. एका फोडणीपात्रात थोडे तूप घ्यायचे. तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायचा. मोहरी मस्त तडतडली की त्यात कडीपत्त्याची पाने घालायची. कडीपत्ता छान परतायचा. नंतर त्यात लाल मिरचीचे तुकडे घालायचे आणि परतायचे. त्यात अगदी काही मेथीचे दाणे घालायचे. सगळं छान परतून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि त्यात लाल तिखट घालायचे. मग ती फोडणी भातात घालायची. 

४. भातात फोडणी घातल्यावर छान मिक्स करायचे. फोडणी भातात मिक्स झाली की गरमागरम भात खायचा. ही रेसिपी खरंच खुप मस्त लागते. अगदीच सोपी आहे.  

Web Title: Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.