Join us
Daily Top 2Weekly Top 5

पॅन टॉस फ्लॉवर, कुरकुरीत पदार्थ भाजी म्हणून खा नाहीतर मुलांना डब्यात खाऊ द्या, १००% आवडेलच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 17:13 IST

Pan toss cauliflower, eat crispy food , children will love it must try : चविष्ट अशी फ्लावरची रेसपी नक्की करा.

फ्लावर म्हणजेच फुलकोबीची भाजी चवीला छान लागते. मात्र नेहमीच बटाटा घालून त्याची पिवळी भाजी करता? तर मग एकदा ही रेसिपी पाहा. फ्लावरचे विविध पदार्थ करता येतात. त्यासाठी अनेक रेसिपी आहेत. ()त्यापैकी एक मस्त रेसिपी म्हणजे पॅन टॉस फ्लावर. (Pan toss cauliflower, eat crispy food , children will love it must try )करायला अगदी सोपा असला तरी हा पदार्थ फार फ्लेवरफुल आहे. पाहा कसे करायचे. 

साहित्य फुलकोबी, हळद, मीठ, लाल तिखट, लसूण, आलं, सुकी लाल मिरची, चाट मसाला, तेल, पाणी , जिरे, लिंबू 

कृती१. फुलकोबी स्वच्छ धुवायचा. त्याचे तुकडे करायचे. एका भांड्यात पाणी घ्यायचे. त्यात मीठ आणि हळद घालायची. पाणी उकळत ठेवायचे आणि त्यात फुलकोबीचे तुकडे घालायचे. उकळून घ्यायचे. जास्त मऊ न करता फक्त थोडे शिजवायचे, निथळत ठेवायचे. पाणी काढून टाकायचे. 

२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचा तुकडा घ्यायचा. सुकी मिरची घ्यायची. तिन्ही पदार्थ एकत्र करुन मिक्सरच्या भांड्यात घाला आणि छान पेस्ट तयार करा. पाणी नको जरा जाडसर वाटले तरी चालेल. 

३. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात जिरे घालायचे. नंतर तयार केलेली पेस्ट घालायची. छान परतून घ्यायची. त्यात हळद आणि तिखट घालायचे तिखट जळण्याआधीच फुलकोबीचे तुकडे घालायचे. परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे. छान परतून घ्यायचे. चाट मसालाही घालायचा. कोबीचे तुकडे जरा कुरकुरीत होऊ द्यायचे. रंग बदलू द्यायचा. वाफवायचे नाही झाकण ठेवले तर ते कुरकुरीत होणार नाहीत. मस्त खमंग परतल्यावर गॅस बंद करायचा.  लिंबाचा थोडा रस घालायचा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स