पावसाळ्याची चाहुल लागल्यावर घरी पहिले बेसनाचे पीठ आणि चहाची पूड आपण आणतो. (palak-moong bhaji, make a delicious bhaji to welcome the rains )कारण पावसाळा सुरू झाला की लगेच भजी आणि चहाची फर्माईश घरोघरी केली जाते. मग ठरलेल्याच भजी आपण करतो. कांदा भजी तसेच बटाटा भजी तर वरचेवर केली जातेच. पण जरा ही वेगळी भजी करुन पाहा. चवीला जरा हटके आणि करायला अगदी सोपी.
साहित्य
मूग डाळ, कांदा, पालक, आलं, कोथिंबीर, मीठ, जिरे, पाणी, तेल, हळद, धणे, तांदळाचे पीठ
कृती
१. एका भांड्यात मूग डाळ भिजत घाला. किमान दोन ते तीन तास डाळ भिजवायची. नंतर भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. त्यात चमचाभर जिरे घालायचे. धणे घालायचे. आल्याचा तुकडा घालायचा. मीठ घालायचे. थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचे.
२. एक दोन आवडीनुसार कांदे घ्यायचे. (palak-moong bhaji, make a delicious bhaji to welcome the rains )कांदा मस्त बारीक चिरुन घ्यायचा. पालकाची ताजी जुडी घ्यायची छान धुऊन स्वच्छ करायची निवडायची. मग मस्त बारीक चिरुन घ्यायची. चिरुन झाल्यावर पालक मूग डाळीच्या वाटलेल्या मिश्रणात घालायची. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच अगदी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळं छान मिक्स करायचे. जास्त पातळ करु नका. जरा जाडच ठेवा. गरज असेल तर थोडे पाणी घालायचे. चमच्याने सोडता येईल असे पीठ करायचे.
३. कढईत तेल तापत ठेवायचे. तेल मस्त कडक तापल्यावर त्यात एकएक करुन भजी सोडायची. चमच्याचा वापर करुन हळूहळू भजी सोडायची. मस्त कुरकुरीत होईपर्यत तळायची. छान खमंग तळून झाल्यावर आवडत्या चटणीशी लावून खायची. चहासोबत खाण्यासाठी अगदी मस्त खाऊ आहे.
४. तुम्हाला भरपूर तेलात तळायचे नसेल तर कमी तेलावरही परतून घेऊ शकता. वेळ जरा जास्त लागेल इतकंच. बाकी चव सुंदरच असते.
५. इअरफ्रायरमध्ये करायची असेल तरी हमखास करता येते. पीठ जरा आणखी घट्ट करायचे. दहा ते पंधरा मिनिटांचा टाईमर लावायचा. मस्त कुरकुरीत भजी तयार होते.
इतरही काही भाज्या जसे की गाजर असेल किंवा कोबी त्याही तुम्ही मिश्रणात घालू शकता. मस्त बारीक चिरायच्या म्हणजे भजीच्या मिश्रणात एकजीव होतील .