Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेवणानंतर १ चमचा पाचक मुखवास खा; पोट साफ-अपचनाचा त्रास टळेल, पाहा सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:32 IST

Pachak Mukhvas Recipe : पाचक मुखवास घरच्याघरी तयार करणं एकदम सोपं आहे. पाचक मुखवास तयार करण्याची सोपी पद्धत पाहूया.

जेवणानंतर अनेक घरांमध्ये मुखवास खाल्ला जातो. ही भारतीय संस्कृतीतील जुनी आणि आरोग्यदायी परंपरा आहे. फक्त तोंडाची चव बदलण्यासाठीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनंही याचे अनेक फायदे आहेत (How To Make Pachak Mukhvas). पाचक मुखवास घरच्याघरी तयार करणं एकदम सोपं आहे. पाचक मुखवास तयार करण्याची सोपी पद्धत पाहूया. (Pachak Mukhvas Recipe)

पाचक मुखवास  कसा करतात?

सर्वात आधी एका छोट्या वाटीत लिंबू पिळून घ्या. त्यात हळद आणि मीठ घाला हे साहित्य एकत्र करून द्रावण बाजूला ठेवून द्या. चांगल्या चवीसाठी तुम्ही यात सैंधव मीठसुद्धा वापरू शकता. नंतर एक कढई गरम करायला ठेवा. कढईत एक वाटी एक वाटी बडीशेप, एक वाटी तीळ, एक वाटी ओवा घालून व्यवस्थित भाजून घ्या. अर्धवट भाजून झाले की त्यात तयार केलेलं हळद, मीठ आणि लिंबाचं मिश्रण घाला. नंतर पुन्हा एकजीव करून व्यवस्थित भाजून घ्या. नंतर यात एक मोठी धण्याची डाळ घाला. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर थंड करून नंतर एका स्वच्छ डब्यात भरा. 

पाचक मुखवास का खायचा?

 जेवण झाल्यानंतर अनेकदा पोटात जडपणा येणं, गॅस  होणं किंवा अपचन होणं अशा समस्या उद्भवतात. मुखवासात वापरले जाणारे पदार्थ जसं की बडीशेप, ओवा, धणा डाळ हे नैसर्गिकरित्या पाचक गुणधर्मांनी परिपूर्ण असते. जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करतात. ज्यामुळे अन्नाचे पचन सुलभ होते.

पाचक मुखवास खाण्याचे फायदे

मुखवासातील मुख्य घटक बडीशेप आणि ओवा हे पोटफुगी आणि अपचनावर रामबाण उपाय आहेत. हे पदार्थ खाल्ल्यानं अन्नाचं पचन लवकर होण्यास आणि पाचक रसांचा स्त्राव वाढवण्यास मदत होते.

कांदा, लसूण किंवा मसाल्यांच्या पदार्थांमुळे श्वासाला उग्र वास घालवण्यासाठी मुखवास उत्तम आहे. यामुळे तोंडात ताजेपणा राहतो. बडीशेप थंड गुणधर्मांची असते. जेवणानंतर ती खाल्ल्यानं होणारी जळजळ पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

 काही मुखवासांमध्ये तीळ किंवा जवस वापरले जाते. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि फायबर्स कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. बाहेर मिळणारा रंगीत आणि साखरयुक्त मुखवास खाण्यापेक्षा भाजलेला मुखवास खाणं कधीही उत्तम ठरतं. अतिप्रमाणात मुखवास खाणं टाळावं. कारण त्यातील काही उष्ण पदार्थ पोटाला त्रास देऊ शकतात. जर तुम्हाला पचनाचे गंभीर  विकार असतील तर केवळ मुखवासांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Digestive mouth freshener recipe: Relieve indigestion and cleanse your stomach.

Web Summary : After-meal mouth fresheners aid digestion. This easy homemade recipe uses fennel seeds, sesame seeds, and carom seeds. These ingredients stimulate digestive enzymes, reducing bloating and acidity. It freshens breath and can help manage cholesterol. However, moderation is advised; consult a doctor for serious digestive issues.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स